‘मुलींना मोबाइल देऊ नका, गुन्हेगारी वाढण्याचे हेच प्रमुख कारण’, उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या सदस्यांचे विधान

member of UP Women's Commission Says Do not give mobiles to girls, biggest reason for increasing crime is Smartphone

member of UP Women’s Commission : महिलांविरुद्ध वाढत असलेले गुन्हे कायम चिंतेचा विषय ठरले आहेत. यावर सातत्याने विविध कारणांचा हवाला दिला जातो. आता उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी यांनी म्हटलंय की, महिलांविरुद्ध गुन्हेगारीत वाढ होण्याला कारणीभूत त्यांनी मोबाइल फोन वापरणे आहे. member of UP Women’s Commission Says Do not give mobiles to girls, biggest reason for increasing crime is Smartphone


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : महिलांविरुद्ध वाढत असलेले गुन्हे कायम चिंतेचा विषय ठरले आहेत. यावर सातत्याने विविध कारणांचा हवाला दिला जातो. आता उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी यांनी म्हटलंय की, महिलांविरुद्ध गुन्हेगारीत वाढ होण्याला कारणीभूत त्यांनी मोबाइल फोन वापरणे आहे.

उत्तर प्रदेशमधील अलिगड येथे मीना कुमारी यांनी येथे म्हटले केले की, महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांबाबत स्वतः समाज गंभीर झाला पाहिजे. मोबाइल ही एक मोठी समस्या बनली आहे, मुली मोबाइलवर तासनतास बोलत असतात. मुलांबरोबर बसतात.

मीना कुमारी म्हणाल्या की, मुलींचे मोबाइलदेखील तपासले जात नाहीत. घरातील सदस्यांना माहिती नाही आणि मग मोबाईलवर बोलत-बोलत ती मुलांबरोबर पळून जाते. उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी यांनी आवाहन केले आहे की, मुलींना मोबाइल देऊ नये आणि त्यांना मोबाईल दिले तर त्यांचे पूर्ण निरीक्षण करावे. त्या म्हणाल्या की, यात आईची मोठी जबाबदारी आहे आणि आज जर मुली बिघडल्या असतील तर त्यांच्या आई त्यास जबाबदार आहेत.

विशेष म्हणजे महिलांविरुद्ध वाढती गुन्हेगारी हा सतत एक मोठा मुद्दा राहिला आहे. परंतु अशा संवेदनशील विषयावर महिला आयोगाच्या सदस्याने मोबाइल फोनला अशा प्रकारे जबाबदार धरत असल्याच्या विधानावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. असे हास्यास्पद विधान पहिल्यांदा झालेले नाही. यापूर्वीही देशाच्या विविध भागांत अशा बाबी पुढे आल्या आहेत. कधी-कधी कपडे, कधी मोबाइल फोन किंवा इतर समस्यांचा उल्लेख स्त्रियांवरील वाढत्या गुन्ह्यांचे मुख्य कारण म्हणून केला गेलेला आहे.

member of UP Women’s Commission Says Do not give mobiles to girls, biggest reason for increasing crime is Smartphone

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात