मुंबापुरीत पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पहिल्याच पावसाने मुबंईची दाणादाण उडवली असून आता पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले.IMD warns Mumabi about heavy rain

हवामान खात्याने शहरात शहरात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. ‘रेड’ अलर्ट अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवतो. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांतही मोसमी पाऊस दाखल झाला आहे. बहुतांश भागांत पाऊस पडत आहे.कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी ‘रेड’; तर काही ठिकाणी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांना पावसाने झोडपून काढले. शहरात सकाळी केवळ तासाभरात ६० मिलिमीटर पाऊस; तर १२ तासांत १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

IMD warns Mumabi about heavy rain

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी