केंद्र सरकार काढणार विकास भारत संकल्प यात्रा; अधिकारीच होणार रथाचे प्रभारी; काँग्रेसची टीका- नागरी सेवक राजकीय प्रचार कसा करू शकतात?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिवाळीनंतर केंद्र सरकार देशभरात ‘विकास भारत संकल्प यात्रा’ काढणार आहे. ही यात्रा देशातील 2.7 लाख ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर याबाबत एक पत्र शेअर केले आहे.Central government will take out Vikas Bharat Sankalp Yatra; The officer will be in charge of the chariot Criticism of Congress

गेल्या 9 वर्षांतील केंद्र सरकारच्या कामगिरीचे दर्शन घडविण्यासाठी विकास भारत संकल्प यात्रा काढण्यात येणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. त्याचे नियोजन, तयारी आणि अंमलबजावणीसाठी सहसचिव, संचालक आणि उपसचिव स्तरावरील अधिकाऱ्यांना रथाचे प्रभारी बनवले जाईल.

पवन खेरा यांनी याला विरोध करत सनदी अधिकाऱ्यांना राजकीय प्रचार करण्याचे आदेश कसे देता येतील, असे सांगितले. त्याच वेळी नरेंद्र मोदींचा हा आणखी एक अहंकारी आदेश असल्याचे जयराम रमेश म्हणाले.

सर्व 765 जिल्ह्यांत रथाचे प्रभारी तैनात करण्यात येणार आहेत

पत्रानुसार ही यात्रा 20 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून पुढील वर्षी 25 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या कालावधीत सर्व 765 जिल्ह्यांमध्ये रथ प्रभारी म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.

हे पत्र भारत सरकारचे अवर सचिव जेएस मलिक यांनी मुख्य आयकर आयुक्तांना लिहिले आहे. रथ प्रभारी बनवण्यासाठी दिल्ली विभागातील 15 अधिकाऱ्यांना नामनिर्देशित करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींनी 6 महिन्यांची मुदत निश्चित केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 महिन्यांत सर्व लोकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठीच विकास भारत संकल्प यात्रा काढण्यात येणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

यात्रेदरम्यान लोकांना प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, पंतप्रधान किसान, पीक विमा योजना, पोषण अभियान, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, जनऔषधी योजना, विश्वकर्मा योजना आणि पंतप्रधान गरीब कल्याण या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

Central government will take out Vikas Bharat Sankalp Yatra; The officer will be in charge of the chariot Criticism of Congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात