प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने देशातील गरीब गरजूंसाठी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मोदी सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणा-या रेशन कार्डधारकांना डिसेंबरपर्यंत मोफत रेशनचा लाभ घेता येणार आहे. दसरा दिवाळी सणांच्या काळात गरीबांना ही आनंदाची बातमी आहे. Central Government visit to festivals; Extension of free ration scheme
डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ
कोविड काळात एप्रिल 2020 मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान गरीब कल्याण योजना(PMGKAY) सुरू करण्यात आली होती. 2022 पर्यंत ही योजना सुरू ठेवण्यात आल्यानंतर मार्च 2022 मध्ये या योजनेला सहा महिने म्हणजेच सप्टेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
80 कोटी जनतेला होणार लाभ
या योजनेचा तब्बल 80 कोटी लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे. यापूर्वी केंद्रीय अन्न विभागाच्या सचिवांनीही ही योजना वाढवण्यासंदर्भात संकेत दिले होते. पंतप्रधान गरीब कल्याण योजना ही जगातील सर्वात मोठी अन्न योजना असल्याचे सांगण्यात येते.
आतापर्यंत या योजनेवर केंद्र सरकारने 3.40 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्वच गरीब रेशन कार्डधारक कुटुंबांना दर महिन्याला प्रति कुटुंब 5 किलो रेशन मोफत दिले जाते. ते आणखी 3 महिने मिळेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App