पॉलीग्राफ चाचणी ही कोर्ट आणि आरोपीच्या संमतीनेच केली जाते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोलकाता येथे एका डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येचे प्रकरण तापले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी संजय रॉयची सीबीआय लाय डिटेक्टर चाचणी करणार असल्याचे वृत्त आहे. या चाचणीला पॉलीग्राफ चाचणी असेही म्हणतात. सीबीआयने संजय रॉय ( Sanjay Roy ) यांची पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली असून सीबीआयने सियालदह न्यायालयात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल केली आहे. पॉलीग्राफ चाचणी ही कोर्ट आणि आरोपीच्या संमतीनेच केली जाते.
ही चाचणी घेण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मिळाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली आहे. आता सीबीआय ही चाचणी लवकरात लवकर करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चाचणी उद्याही होऊ शकते. वास्तविक सीबीआयला संजय रॉय कडून या घटनेचे सत्य जाणून घ्यायचे आहे. त्यामुळेच ही चाचणी होणार आहे.
दरम्यान, कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्ट 2024 रोजी एक पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर मृतावस्थेत आढळली होती. बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी सविस्तर पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. ज्यात पीडितेवर झालेले क्रौर्य उघड झाले आहे. पीएम रिपोर्टनुसार मृताच्या शरीरावर 14 हून अधिक जखमांच्या खुणा होत्या.
डोके, दोन्ही गाल, ओठ (वरचा आणि आतील), नाक, उजवा जबडा, हनुवटी, मान (एपिग्लॉटिसच्या जवळ आणि वर), डावा हात, खांदा, गुडघा, घोटा आणि प्रायव्हेट पार्टवर जखमा आढळल्या. शरीराच्या अनेक भागांमध्ये रक्ताच्या गुठळ्यांसह फुफ्फुसात रक्तस्त्राव झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. व्हिसेरा, रक्त आणि इतर गोळा केलेले नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App