कॅनडाने भारताशी मुक्त व्यापार चर्चा टाळली; 6 दिवसांपूर्वी मोदींनी पीएम ट्रूडो यांच्याकडे केली होती खलिस्तानींवर कारवाईची मागणी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 10 सप्टेंबर रोजी G20 शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी तेथील अतिरेकी घटकांच्या “भारतविरोधी कारवायांवर” चिंता व्यक्त केली होती. अवघ्या सहा दिवसांनंतर, कॅनडाने भारताशी मुक्त चर्चा टाळली आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, कॅनडाच्या व्यापार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने याला दुजोरा दिला आहे. मात्र, यासाठी कोणतेही कारण देण्यात आलेले नाही.Canada avoids free trade talks with India; 6 days ago, Modi had asked PM Trudeau to take action against Khalistani

भारतातील एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, दोन्ही देशांमधील व्यापाराशी संबंधित चर्चा तेव्हाच होईल जेव्हा इतर समस्यांचे निराकरण होईल. ते म्हणाले- कॅनडामध्ये अशा काही राजकीय घडामोडी घडत होत्या. ज्यावर भारताने आक्षेप घेतला होता. जोपर्यंत त्यांचे निराकरण होत नाही. तोपर्यंत कॅनडासोबतच्या व्यापार कराराची चर्चा थांबलेली आहे. कॅनडासोबत 10 वर्षांच्या मुक्त व्यापार करारासाठी चर्चा सुरू आहे.G20 नंतर कॅनडात ट्रुडो यांनी केली टीका

G20 परिषदेसाठी भारतात आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो 2 दिवस दिल्लीत अडकले होते. याआधी पंतप्रधान मोदींनी त्यांची केवळ अनौपचारिक भेट घेतली होती. खलिस्तानींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीएम मोदींनी ट्रुडो यांच्याकडे केली होती. त्याचवेळी, बैठकीनंतर खलिस्तानच्या मुद्द्यावर ट्रूडो म्हणाले होते – गेल्या काही वर्षांत मी या मुद्द्यावर पीएम मोदींशी बोललो आहे. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे नेहमीच समर्थन करतो. शांततापूर्ण निदर्शने हा प्रत्येकाचा अधिकार आहे.

ट्रुडो म्हणाले होते- यासोबतच आम्ही हिंसेला विरोध करतो आणि कोणत्याही प्रकारची द्वेषाची भावना दूर करू. हे लक्षात ठेवले पाहिजे की काही लोकांच्या कृती संपूर्णपणे कॅनडाच्या विचारांना प्रतिबिंबित करत नाहीत. आम्ही कायद्याचा आदर करतो.

यावर कॅनडाच्या विरोधी पक्षांनीही ट्रुडो यांच्यावर टीका केली. खरं तर, ट्रूडो संपूर्ण G20 शिखर परिषदेदरम्यान एकाकी दिसले. राष्ट्रपती मुर्मू यांनी दिलेल्या G2O समिटच्या डिनर कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले नाहीत.

त्यानंतर 10 सप्टेंबरच्या संध्याकाळी ते भारतासाठी रवाना होणार असताना त्यांच्या विमानात बिघाड झाला. यावर भारताने त्यांना आयएएफ वन विमानाची सेवा देऊ केली होती पण कॅनडाने नकार दिला. ट्रुडो यांच्या विमानाची 36 तासांनंतर दुरुस्ती करण्यात आली आणि ते त्यांच्या देशात परत येऊ शकले.

कॅनडाच्या पंतप्रधानांचे विमान 36 वर्षे जुने

ट्रुडो यांनी वापरलेले विमान 36 वर्षे जुने आहे. यापूर्वीही यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ऑक्टोबर 2016 मध्ये ट्रूडो यांच्या विमानाने बेल्जियमसाठी उड्डाण केले, परंतु तांत्रिक बिघाडामुळे त्यांना मध्यमार्गी परतावे लागले. 2019 मध्ये जेव्हा ट्रूडो नाटो शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी युरोपला गेले होते, तेव्हा त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता.

Canada avoids free trade talks with India; 6 days ago, Modi had asked PM Trudeau to take action against Khalistani

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात