“सुभेदारी” “ठीक” आहे, “चांगले” नव्हे, मुख्यमंत्री – मंत्र्यांसाठी नवीन विश्रामगृह बांधा; अजितदादांची मागणी

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वंदे मातरम सभागृहात झाले. यावेळी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजीनगर मधील सुभेदारी विश्रामगृहाबाबत भाष्य केले सुभेदारी विश्रामगृह “ठीक” आहे, “चांगले” नाही. त्यामुळे संभाजीनगर मध्ये मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसाठी नवीन विश्रामगृह बांधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. आपण अर्थमंत्री म्हणून त्यासाठी निधी देऊ असे अजित पवार यांनी सांगितले. chief minister and ministers new rest house construction : ajit pawar

काँग्रेस राष्ट्रवादीची 15 वर्षे सत्ता होती. त्यानंतर भाजपची 5 वर्षे सत्ता, त्यानंतर 2.5 वर्षे महाविकास आघाडीचे ठाकरे पवार सरकारची सत्ता आणि आता शिंदे – फडणवीसांची सत्ता एवढ्या कालावधीत अजित पवार फक्त भाजपच्या 5 वर्षांच्या सत्ता काळात सत्तेवर नव्हते. बाकीची 15 वर्षे नंतरची अडीच वर्षे आणि आत्ताचे 13 महिने अजित पवार सत्तेवर आहेत. आता अजित पवारांना सुभेदारी विश्रामगृह “ठीक” वाटायला लागले आहे.

तसेच अजित पवारांनी छत्रपती संभाजी नगर मध्ये पाणीपुरवठा नीट कसा नाही??, असा सवाल शासकीय यंत्रणेला विचारून जाहीर नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरची पाणी योजना पूर्ण होण्यास एवढी वर्षे का लागतात?? मला तर काही कळत नाही, असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांसह मंत्र्यांना केला.

अजित पवार म्हणाले, जायकवाडीमधून छत्रपती संभाजीनगर शहरात पाणी आणण्यास एवढी वर्षे का लागावीत? मला तर काही कळतच नाही. यावेळी पालिका आयुक्त जी. श्रीकांत यांना उद्देशून अजित पवार म्हणाले, छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी मिळालेच पाहीजे. पाणी योजनेचे काम वेळेत पूर्ण झालेच पाहीजे. यात हयगय होता कामा नये.

काही भागात स्वच्छतेची गरज

यावेळी छत्रपती संभाजीनगर शहरातील काही भागातील अस्वच्छतेवरही अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली अजित पवार म्हणाले,काही भागात स्वच्छतेची गरज आहे. शहरात अस्वच्छता असता कामा नये. शहरात महापालिकेने काही इमारतींची कामे उत्कृष्ट केली आहे. हज हाऊस, वंदे मातरम हे सभागृह उत्तम बांधले आहेत. शहरातील इमारतींचे काम अशाच पद्धतीने झाले पाहीजे.



अतिक्रमण काढणे गरजेचे पण…

छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरही अजित पवार यांनी भाष्य केले. अजित पवार म्हणाले, शहरात अतिक्रमण जास्त वाढता कामा नये. अतिक्रमणे काढलेच पाहीजे. पण, त्याचसोबत तेथे राहणाऱ्या नागरिकांनाही वाऱ्यावर सोडता कामा नये. त्या नागरिकांची पर्यायी व्यवस्था करण्याकडेही लक्ष दिलेल पाहीजे.

शहरात सुसज्ज विश्रामगृह हवे

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्कामासाठी आलिशान हॉटेलमध्ये सूट बुक करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस व अजित पवार या उपमुख्यमंत्र्यांनीही तारांकित हॉटेललाच पसंती दिली होती. ‘दिव्य मराठी’ने या उधळपट्टीची बातमी प्रकाशित केल्यानंतर सरकारने अखेर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निवास व्यवस्थेत बदल केला. आता हे तिघेही सुभेदारी विश्रामगृहातच मुक्काम करणार आहेत. सुभेदारी विश्रामगृहातील अवस्थेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, सुभेदारी विश्रामगृह हे ठीक आहे. म्हणजे ठीकच आहे, चांगले नाही असे म्हणावे लागेल. त्यासाठी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एक विश्रामगृह बांधावे. अर्थमंत्री म्हणून आम्ही त्याला सहकार्य करू.

chief minister and ministers new rest house construction : ajit pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात