वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी आज 36 जगासाठी मतदान झाले. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपुर येथील मतदान केंद्रावर मतदान केले.By Mamata Banerjee of West Bengal Right to vote
मातदानानंतर त्यांनी उजव्या हाताची दोन बोटे उंचावून विजय आपलाच असल्याचा संकेत दिला.36 मतदारसंघात 81 लाख मतदार असून त्यात महिला मतदारांची संख्या 39 लाख आहे.
त्यामुळे महिला मतदारांची मते निर्णायक ठरू शकतात. 268 उमेदवार रिंगणात असून त्यात 36 महिला आहेत. 11 हजार 376 मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था केली होती.
पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक एकूण आठ टप्प्यात घेतली आहे. आज सातव्या टप्प्यासाठी मतदान झाले. शेवटच्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला मतदान होत असून 2 मे रोजी निकाल जाहीर होतील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App