OSCAR 2021 : अँड द ऑस्कर गोज टू …डिंपल खुष तर प्रियंका निराश ; इरफान खान इन मेमोरिअम ; ना होस्ट ना ऑडिअंस …वाचा सविस्तर


  • एन्टरटेनमेंट जगातील सर्वांत मोठा आणि मौल्यवान पुरस्कार

  • ‘नोमेडलँड’ या सिनेमाने 2021 च्या सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. नोकरी गेल्यानंतर घराबाहेर पडून फिरायला निघालेल्या एका महिलेची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिने या सिनेमात या महिलेची मुख्य भूमिका साकारली आहे.

  • 93 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रियंका चोप्रा निराश झाली आहे. तिचा ‘द व्हाइट टायगर’ (The White Tiger) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दत्तक (Adopted) स्क्रीनप्ले प्रकारात नामांकन देण्यात आले होते. पण या प्रकारात हा पुरस्कार ‘द फादर’ (The Father) या चित्रपटाला मिळाला आहे.

  • भारतीय अभिनेता इरफान खान आणि भारताची पहिली ऑस्कर पुरस्कारप्राप्त वेशभूषा डिझाईनर भानू अथैया यांना   पुरस्कार सोहळ्यातील ‘स्मृती’ विभागात गौरविण्यात आले. दरवर्षी प्रमाणे, अकादमी अवॉर्ड्सने तीन मिनिटांच्या ‘इन मेमोरिअम माँटाज ‘(चित्रांचे व्हिडिओ कोलाज) मध्ये गेल्या वर्षात निधन झालेल्या दिगज्जांना श्रद्धांजली वाहिली.

विशेष प्रतिनिधी

लॉस एंजेलिस : सिनेविश्वातील सर्वोच्च पुरस्कार असणारा ९३ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा यंदा लॉस एंजेलिसमध्ये पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘नोमेडलँड’ने बाजी मारली. तर ‘द प्रॉमिसिंग यंग वुमन’, ‘द फादर’, ‘साऊंड ऑफ मेटल’ या चित्रपटांचीदेखील वर्णी लागली. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता हा सोहळा व्हर्च्युअल पद्धतीने झाला.  ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता इरफान आणि वेशभूषाकार भानु अथैया यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.OSCAR 2021! AND THE OSCAR GOES TO ..IRFAN IN MEMORIES, SAD PRIYANKA HAPPY DIMPLE…READ MORE

ऑस्कर पुरस्कार हा एन्टरटेनमेंट जगातील सर्वांत मोठा आणि मौल्यवान पुरस्कार मानला जातो. ऑस्कर नामांकनांच्या यादीमध्ये स्थान मिळावे यासाठी तसेच पुरस्कारासाठीच्या शर्यतीत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करावे यासाठी जगभरातील फिल्म मेकर्स खूप प्रयत्न करतात. जगभरात सर्वाधिक चर्चेत आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी केवळ नऊ चित्रपट अंतिम निवडीपर्यंत पोहोचतात आणि त्यापैकी फक्त पहिल्या पाच चित्रपटांना नामांकन मिळते आणि त्यापैकी एक चित्रपटाला ऑस्कर दिला जातो.

यंदाचा पुरस्कार सोहळा यासाठी खास आहे, कारण त्याचे सूत्रसंचालन कोणाच्याही हाती नव्हते कोणी प्रेक्षकही या सोहळ्यासाठी उपस्थित नाव्हते.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात नेटफ्लिक्सने चांगलाच दबदबा प्रस्थापित केल्याचे दिसून आले. तब्बल 36 नामांकने एकट्या नेटफ्लिक्सकडे होती. यामध्ये डेविड फिन्चरचा ब्लॅक एंड व्हाइट ड्रामा ‘मैनक’चाही समावेश आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता अँथनी हॉपकिंस

अभिनेते अँथनी हॉपकिंस यांना ‘द फादर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (नोमडलँड)

सर्वोत्कृष्ट चित्रपट: ‘नोमडलँड’ ठरला यंदाचा सर्वोत्कृष्ट. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका अशा एकूण सहा श्रेणीत नामांकन मिळालं आहे.

ओरिजनल साँग

‘जुडास अ‍ॅण्ड द ब्लॅक मसीहा’ चित्रपटातील ‘फाइट फॉर यू’ गाणे

ह्युम्यानिटेरियन अवॉर्ड : अभिनेता टायलर पेरीला २०२१ मधील मानवतावादी पुरस्कार मिळाला.

ओरिजनल स्कोअर- ‘सोल’

‘सोल’ या चित्रपटाला ओरिजनल स्कोअर पुरस्कार मिळाला आहे.

फिल्म् एडिटिंग : ‘साऊंड ऑफ मेटल ‘

बेस्ट प्रोडक्शन डिझाइन: ‘मँक’ चित्रपट

व्हिज्युअल इफेक्ट: ‘टेनेट’ चित्रपट

बेस्ट सिनेमॅटोग्राफी : ‘मँक’ चित्रपट

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : युन यू जंग

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड मूव्ही : ‘सोल’

बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट सब्जेक्ट : कोलेत’

बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर : ‘माय ऑक्टोपस टीचर’

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म : ‘इफ एनीथिंग हॅपन्स आय लव्ह यू’

बेस्ट साऊंड : ‘साऊंड ऑफ मेटल’

सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म : ‘टू डिस्टेंस स्ट्रेंजर’

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : क्लोई जाओ

सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार : अ‍ॅन रॉथ

सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल : सर्जिओ लोपेझ-रिवेरा, मिया नियल आणि जमिका विल्सन यांना ‘मिया रेनीज ब्लॅक बॉटम’ चित्रपटासाठी.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: डॅनियेल कालूया

सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म : ‘अनदर राऊंड’

ओरिजनल स्क्रीनप्ले : ‘द प्रॉमिसिंग यंग वुमन’

सर्वोत्कृष्ट रुपांतरीत स्क्रीनप्ले : ‘द फादर’ सिनेमाला ऑस्कर

OSCAR 2021! AND THE OSCAR GOES TO ..IRFAN IN MEMORIES, SAD PRIYANKA HAPPY DIMPLE…READ MORE

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात