पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात भाजप विजयी, ममता बॅनर्जी पराभूत ; भाजपाध्यक्ष नड्डा यांचे मत


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात भाजप विजयी होत असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पराभूत होत चालल्या आहेत, त्यामुळे त्या निराश झाल्या असून नागरिकांवर संतप्त होत आहेत ,असे मत भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केले.In every phase of West Bengal elections BJP wins, Mamata Banerjee loses; BJP president Nadda’s opinion

राज्यात निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी मतदान झाले. त्या पार्श्वभूमीवर ते कोलकाता मतदारसंघातील जोरसांको मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी एका व्हरच्युअल मीटिंगमध्ये बोलत होते.नड्डा म्हणाले, राज्यातील नागरिकांच्या आशीर्वादाने सातवा टप्प्यातील मतदान पार पाडले आहे. भाजपला प्रत्येक टप्प्यात यश मिळत असल्याचे पाहून ममता बॅनर्जी निराश झाल्या आहेत. त्यातून त्या नागरिकांवर आग पाखड करत आहेत.

राज्यात भाजपची सत्ता असल्यावर केंद्राच्या सर्व योजना प्रभावीपणे लागू केल्या जातील. त्यामध्ये लॉकडाऊन गरिबांना मोफत रेशन देण्याच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचाही समावेश असेल.

In every phase of West Bengal elections BJP wins, Mamata Banerjee loses; BJP president Nadda’s opinion

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती