Munavvar Rana : प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांच्या मुलावर गोळीबार झाल्याप्रकरणी रायबरेली पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांच्या तपासणीनुसार, मुनव्वर राणा यांच्या मुलाने काका आणि चुलतभावांना गोवण्यासाठी स्वत:वर गोळीबार घडवून आणला. या संपूर्ण प्रकरणामागे मालमत्तेचा वाद सांगितला जात आहे. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. Bullets fired by Munavvar Rana son to trap uncle, big revelation from UP police
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांच्या मुलावर गोळीबार झाल्याप्रकरणी रायबरेली पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांच्या तपासणीनुसार, मुनव्वर राणा यांच्या मुलाने काका आणि चुलतभावांना गोवण्यासाठी स्वत:वर गोळीबार घडवून आणला. या संपूर्ण प्रकरणामागे मालमत्तेचा वाद सांगितला जात आहे. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. मुनव्वर राणा यांचा मुलगा रायबरेलीच्या पेट्रोल पंपावर पोहोचला, पेट्रोल पंपाच्या बाहेर गाडी उभी केली, स्वत:देखील गाडीत बसून राहिला. काही वेळाने तेथे दोन-तीन शूटर पोहोचले, गाडीची पाहणी केल्यानंतर पेट्रोप पंपच्या गेटवर गोळीबार करून पळून जातात.
सीसीटीव्हीवरून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रायबरेली पोलीस काल रात्री मुनव्वर राणाच्या मुलाला पकडण्यासाठी त्याच्या घरी गेले होते, पण तो सापडला नाही. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या सर्व शूटर्सना पोलिसांनी अटक केली असून संपूर्ण प्रकरण उघडकीस आणत आहे. याप्रकरणी मुनव्वर राणा यांच्या मुलाला लवकरच अटक केली जाऊ शकते.
रायबरेली येथील ओम क्लार्क हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेपूर्वी मुनव्वर राणा यांच्या मुलाची अडीच तास शूटरशी मीटिंग झाली होती. दुपारी बारा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत तबरेज शूटरसह तो हॉटेलमध्ये हजर होता. या प्रकरणात रायबरेली पोलिसांनी हलीम, सुलतान, सतेंद्र तिवारी आणि शुभम सरकार यांना अटक केली आहे.
दुचाकीस्वारांमध्ये दोघे शूटर रायबरेलीमध्ये होर्डिंगचे काम करणारी मुले आहेत. ती बर्याच वेळा तुरुंगातही गेले आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, तबरेझने चुलतभावाच्या जमिनीचा वाटा 85 लाख रुपयांना विकला होता, त्यानंतर चुलतभावांनी या जमीन व्यवहारास आक्षेप घेतला होता, त्यानंतर तबरेजवर पैसे परत देण्यास दबाव होता.
तत्पूर्वी, यूपी पोलिसांनी रात्री उशिरा लखनऊमधील मुनव्वर राणा यांच्या घरावर छापा टाकला. पोलिसांच्या अचानक आगमनामुळे कुटुंबातील सदस्यांना आश्चर्यचकित झाले होते. यावर कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, पोलिसांनी काहीही सांगण्यास नकार दिला आणि केवळ घराची झडती घेतली. या तपासावर कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत.
मुनव्वर राणा यांची मुलगी आणि कॉंग्रेस नेत्या फौजिया राणा यांनी प्रशासनावर सूड उगवल्याचा आरोप केला आहे. एका व्हिडिओमध्ये फौजियांनी म्हटले आहे की, आम्हाला खूप त्रास दिला जात आहे, माझ्या आजारी वडिलांनाही त्रास दिला जात आहे, प्रशासन आमच्या वडिलांचा आणि आमचा सूड घेत आहे, पोलीस सर्च वॉरंटशिवाय घरात घुसले.
मुनव्वर राणा यांचा मुलगा तबरेज राणा याच्यावर दुचाकीस्वार गुंडांनी दिवसाढवळ्या गोळीबार केल्याचे सांगण्यात येत होते. त्रिपुलातील पेट्रोल पंपावर दोन जणांनी गोळीबार केला, त्यानंतर दोन्ही गोळ्या त्यांच्या कारला लागल्या. हल्लेखोर तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता हा बनाव असल्याचा मोठा खुलासा केला आहे.
Bullets fired by Munavvar Rana son to trap uncle, big revelation from UP police
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App