विशेष प्रतिनिधी
सिमला – एकीकडे महाराष्ट्रात दरडी कोसळून दुर्घटना होत असताना हिमालयाच्या डोंगररांगातही दरडी कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. आता हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात भूस्खलनामुळे दरड कोसळून किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.Briton gave vaccine to all adult people
गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात पाऊस सुरू होता. बटेसर गुहेच्या भागात भूस्खलनाची शक्यताही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली होती. काही स्थानिकांनी या पर्यटकांना तेथे न जाण्याचा सल्लाही दिल्याची माहिती पुढे आली आहे.भूस्खलनामुळे आणखी इतरही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
मृत्युमुखी पडलेले सर्वजण पर्यटक असून, ते दिल्लीतून आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरड कोसळल्याने एक पूलही तुटला आहे. किन्नौर जिल्ह्यातील सांगला खोऱ्यात बटेसर गुहेच्या जवळ ही दुर्घटना घडली आहे. सांगलाच्या दिशेने चाललेल्या पर्यटकांच्या मोटारींवर ही दरड कोसळली.
दुर्घटनेची माहिती कळताच पोलिस आणि प्रशासनाची मदत पथके घटनास्थळी पोहोचली. परंतु, त्या भागात भूस्खलन होत असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. बटेसरी येथील पूलही तुटल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा पूल तुटल्याने गावाचा देशाशी असलेला संपर्कही तुटला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App