वृत्तसंस्था
बंगळूर – कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्याच्या एक आठवड्यानंतर बसवराज बोम्मई यांनी २९ मंत्र्यांचा समावेश करून मंत्रिमंडळाचा विस्तार केला. पूर्वीच्या बी. एस. येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात २३ मंत्री याही मंत्रिमंडळात असून, सहा नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. Bommai takes new 29 ministers in cabinet
राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी राजभवन येथे नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. येडियुरप्पा यांचे पुत्र आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनाही संधी देण्यात आलेली नाही. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या लक्ष्मण सवदी यांना येडियुरप्पा मंत्रिमंडळात केवळ मंत्रीच नाही, तर उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले होते. परंतु, या वेळी त्यांना वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मंत्रिपदासाठी कॉंग्रेसमधून आलेल्या श्रीमंत पाटील यांनाही मंत्रिमंडळातून डावलण्यात आले.
नवीन मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्ये आठ लिंगायत, सात वक्कलींग, सात ओबीसी, तीन एससी, दोन ब्राह्मण, एक एसटी, एक रेड्डी आणि एक महिला आहेत. २०१९ मध्ये काँग्रेस-जेडीएस आघाडी सोडल्यावर भाजपमध्ये सामील झालेल्या १० आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. येडियुरप्पा सरकारमध्ये त्यापैकी ११ मंत्री होते. त्यातील श्रीमंत पाटील आणि आर. शंकर यांना बोम्मई मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही; तर मुनीरत्न यांना नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App