विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधी यांची काँग्रेस मुख्यालयातील दुपारी 1.00 वाजताची प्रेस कॉन्फरन्स पाहिली आणि वर दिलेले शीर्षक सापडले!!, बोफोर्सच्या बदल्यातून मोदी – अदानींवर आरोप; काँग्रेसला राहुल गांधींवर सापडले विश्वनाथ प्रताप सिंहांचे रूप!!, याचे कारण राहुल गांधींनी ज्या पद्धतीने प्रेस कॉन्फरन्स मध्ये गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांसंदर्भात आरोप केले आणि गौतम अदानींच्या कंपनीत शेल कंपनीत 20000 कोटी रुपये कुठून आले??, हा सवाल केला यात आहे.Bofors allegations refuted; Congress found new vishwanath pratap Singh in rahul Gandhi!!
बोफोर्स तोफा घोटाळा
राजीव गांधींची सत्ता 1986 मध्ये ज्या वेळेला फुल स्विंग मध्ये होती, त्यावेळीच त्यांचेच संरक्षण मंत्री विश्वनाथ प्रताप सिंह यांनी बोफोर्स तोफा खरेदी घोटाळ्यात लाचखोरी झाल्याचा आरोप करून राजीव गांधी यांच्या भोवती संशयाचे जाळे विणले होते. त्या जाळ्याचे नंतर मोठ्या वादळात रूपांतर झाले. विश्वनाथ प्रताप सिंह काँग्रेस मधून बाहेर पडले आणि त्यांनी जनमोर्चाच्या रूपाने सर्व विरोधकांची मोट बांधून 1989 च्या निवडणुकीत राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षावर मात करून ते पंतप्रधान बनले होते.
राहुल गांधी यांनी आजच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये ज्या पद्धतीने गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधाबाबत आरोप केले आहेत आणि गौतम अदानींच्या शेल कंपन्यांमध्ये 20000 कोटी रुपये कुठून आले??, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे, त्यातूनच काँग्रेस पक्षाला राहुल गांधींच्या रूपात नवे विश्वनाथ प्रतापसिंह सापडल्याचे दिसत आहे!!
राहुल गांधी पत्रकारांवरच भडकले
राहुल गांधींना देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्याबद्दल सुरत कोर्टाने दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली. त्यामुळे कायदेशीर तरतुदींच्या आधारे त्यांची खासदारकी लोकसभेच्या सभापतींनी रद्द केली. पण त्यावर हा “लीगल मॅटर” आहे असे सांगून राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आणि उलट पत्रकारांवरच तुम्ही भाजपचे काम करता इथून पुढे छातीवर भाजपचे झेंडे लावून या पत्रकार असल्याची बतावणी करू नका अशी आगपाखड करत आपल्या तोफा अदानी आणि मोदी यांच्यावर केंद्रित केल्या.
मोदींभोवती संशयाचे जाळे विणण्याचा प्रयत्न
परंतु राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्स हा सगळा भर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोवती संशयाचे जाळे विणून नंतर त्याचे वादळात रूपांतर करावे हाच होता आणि आहे. इथेच त्यांचे राहुल गांधींचे विश्वनाथ प्रताप सिंह यांच्याशी साम्य दिसते. राहुल गांधींनी गौतम अदानी यांचा पैसा ड्रोन आणि वेगवेगळ्या संरक्षण सामग्रीच्या संशोधनात गुंतल्याचे प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितले. याचा अर्थ गौतम अदानींचे संरक्षण क्षेत्रातले पदार्पण त्यांना खटकते आहे, असाच होतो आहे. बोफोर्स तोफा खरेदी घोटाळा हा देखील संरक्षण क्षेत्राशी संबंधितच होता आणि अदानींवर राहुल गांधींनी केलेला आरोप संरक्षण क्षेत्राशी संबंधितच आहे.
गांधी घराण्याचे मूळ राजकीय दुःख
इथेच गांधी परिवाराच्या मूळच्या राजकीय दुखण्याची मेख आहे. संरक्षण साहित्य खरेदी परदेशातून व्हावी हे काँग्रेसचे सातत्याने धोरण राहिले आहे. त्या उलट देशातल्या खासगी उद्योगांना संरक्षण साहित्य निर्मितीत प्राधान्य द्यावे हे केंद्रातल्या मोदी सरकारचे धोरण आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी काँग्रेसमध्येच राहून नवे विश्वनाथ प्रताप सिंह बनत नरेंद्र मोदी आणि अदानींवर निशाणा साधला आहे.
https://youtu.be/MWjDW0MrYE8
विरोधकांऐवजी काँग्रेसला सापडले
प्रत्यक्षात केंद्रातल्या भाजप सरकार विरुद्ध विरोधकांची एकजूट साधण्यासाठी प्रादेशिक पक्ष नवे विश्वनाथ प्रताप सिंह शोधायच्या मागे लागले आहेत. पण राहुल गांधींच्या रूपाने काँग्रेसलाच नवे विश्वनाथ प्रताप सिंह सापडले आहेत. पण विश्वनाथ प्रताप सिंह यांनी राजीव गांधी यांच्या भोवती जसे बोफोर्स तोफा खरेदी घोटाळे संशयाचे यशस्वी जाळे विणले, तसे जाळे राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्या भोवती विणू शकतात का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App