उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण; पंतप्रधान मोदींचे मानले आभार

CM Yogi

परस्पर समन्वय आणि संवादातून भाजपाने पूर्ण बहुमताचे सरकार आणि सरकारचे स्थैर्य साध्य केल्याचे, योगींनी सांगितले आहे.

 विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (शनिवार) सांगितले की, त्यांच्या सरकारच्या सहा वर्षांच्या कारकिर्दीत राज्याने पायाभूत सुविधा मजबूत केल्या आणि ‘दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी दंगल’ होत असल्याचा समज मोडला.  उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी (भाजप) सरकारने आज आपल्या दुसऱ्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण केले. सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना योगी म्हणाले की, त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशने देशात आणि जगात नवी ओळख निर्माण केली आहे. Yogi Sarkar second tenure in Uttar Pradesh completes one year Thanks to Prime Minister Modi

संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच आले प्रसारमाध्यमांसमोर, म्हणाले…

लखनऊ येथील लोक भवनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना आदित्यनाथ म्हणाले, “सहा वर्षांपैकी तीन वर्षे जागतिक महामारीशी लढण्यात घालवली आणि त्यातून आम्हाला मार्ग सापडला.” उत्तर प्रदेशने अनेक यश संपादन केले. उत्तर प्रदेशमध्ये विकास होऊ शकत नाही, असे म्हटले जात होते, मात्र आज पंतप्रधानांच्या प्रेरणेने उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकाच्या शर्यतीत आहे आणि पुढे वाटचाल करत आहे. ही सहा वर्षे उत्तर प्रदेशसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत. परस्पर समन्वय आणि संवादातून भाजपाने पूर्ण बहुमताचे सरकार आणि सरकारचे स्थैर्य साध्य केले.

विरोधी पक्षांवर हल्लाबोल करताना आदित्यनाथ म्हणाले, “उत्तर प्रदेशमध्ये पारंपारिक जात, धर्म, भ्रष्टाचार आणि कुटुंबवादाच्या नावावर राजकारण केले जात असे, परंतु त्याशिवाय उत्तर प्रदेशप्रमाणे राज्याची ओळख ही अफाट क्षमता असलेले राज्य आहे. यासाठी आमची संपूर्ण टीम कामाला लागली आहे.” याशिवाय त्यांनी दावा केला की,” उत्तर प्रदेश सहा वर्षांत दंगलमुक्त झाला आणि पायाभूत सुविधा मजबूत केल्या आहेत.

Yogi Sarkar second tenure in Uttar Pradesh completes one year Thanks to Prime Minister Modi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात