बोफोर्स प्रकरणाचा बाण जयराम रमेश यांनी नेमका कोणाला मारलाय…??


कोरोना व्यवस्थापन आणि बोफोर्स प्रकरणाचे व्यवस्थापन यांची तुलना करून काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी नेमके कोणाला दुखावून ठेवले आहे, याचा नीट विचार केला पाहिजे. रमेश यांचे argument मोदींवर टीका करणारे असले तरी पण बोफोर्सच्या विषयातून मोदींपेक्षा इतर कोणते नेतृत्व राजकीयदृष्ट्या दुखावले जाते… बोफोर्सचा विषय नेमका कोणासाठी राजकीयदृष्ट्या अडचणीचा ठरतो, याचा इतिहास पाहिला तर यातली एक वेगळी “राजकीय मेख” लक्षात येईल. Who the real target of jairam ramesh in bofors argument?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोरोनाच्या गैरव्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून टीका करताना काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ४० वर्षे जुने बोफोर्स प्रकरण उकरून काढले आहे. “कोरोना” म्हणे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी “बोफोर्स” ठरणार आहे. ज्या बोफोर्स प्रकरणाने राजीव गांधींची सत्ता घालविली, तशीच २०२४ मध्ये मोदींची सत्ता “कोरोना” घालविणार आहे. बोफोर्स प्रकरणाचे व्यवस्थापन करणे राजीव गांधींना जमले नाही. त्याच प्रमाणे कोरोनाचे व्यवस्थापन करणे मोदींना जमलेले नाही. परिणामी मोदींना राजीव गांधींसारखीच सत्ता गमवावी लागेल, असे argument जयराम रमेश यांनी केले आहे. रमेश यांच्या काँग्रेसनिष्ठेविषयी आणि मोदीविरोधाविषयी शंका घ्यायचे कारण नाही.

पण रमेश यांनी केलेल्या बोफोर्सी argument चा विचार केला तर तो विषय काढून रमेश नेमके कोणाला दुखावून ठेवले आहे, याचा नीट विचार केला पाहिजे. बोफोर्सविषयाचे argument वरवर पाहता मोदींवर टीका करण्यासाठी वापरल्याचे वाटते हे खरे पण आहे. पण बोफोर्सचा विषय काढल्यानंतर मोदींपेक्षा इतर कोणते नेतृत्व राजकीयदृष्ट्या दुखावले जाते…?? बोफोर्सचा विषय नेमका कोणासाठी राजकीयदृष्ट्या अडचणीचा ठरतो…??, याचा राजकीय इतिहास पाहिला तर यातली एक वेगळी “राजकीय मेख” लक्षात येईल.

राजीव गांधींच्या दुर्दैवी निधनानंतरही गांधी कुटुंबीयांसाठी बोफोर्स हा विषय राजकीयदृष्ट्या अडचणीचा राहिला आहे. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह रावांच्या कारकिर्दीत देखील या प्रकरणातील लाचखोरीची चौकशी सुरू राहिली होती आणि गांधी कुटुंबीयांचा निकटवर्ती ऑटोव्हिओ क्वात्रोचीपर्यंत पोहोचली होती.

साधारण १९९१ ते १९९६ चा काळ पाहिला तर ज्या ज्या वेळी सोनिया गांधींनी भारतीय राजकारणात डोके वर काढण्याचा प्रयत्न केला, त्या त्या वेळी कोठून ना कोठून तरी बोफोर्स प्रकरणाची कोणती तरी बातमी राष्ट्रीय मीडियात हेडलाइन व्हायची. त्याची चर्चा दिल्लीतल्या सत्ताधारी काँग्रेसी वर्तुळात फिरत राहायची. १० जनपथ अस्वस्थ व्हायचे आणि मग काही दिवसांनी ही बातमी थंड पडायची. हा चक्रनेमीक्रम साधारण ६ वर्षे सुरू होता. त्यामुळे बोफोर्स प्रकरण हे राजीव गांधींच्या निधनानंतरही गांधी कुटुंबीयांसाठी नेहमीच politically haunting राहिले आहे.

आता देखील राजीव गांधींच्या जयंतीच्याच आगेमागे जयराम रमेश यांनी बोफोर्स प्रकरणावर लेख लिहून भले मोदींवर टीका केली असेल, त्यातून टोचले गेलेय गांधी कुटुंबीयच… विशेषतः सोनिया गांधीच…!! कारण त्याच अशा नेत्या आहेत, की ज्यांना बोफोर्स प्रकरणाच्या सावलीतून कायमचे बाहेर पडायचे आहे. राजकीय संशयाचे जाळे भेदून टाकायचे आहे. पण रमेश यांच्या लेखामुळे सोनियांच्या या प्रयत्नांनाच छेद गेला आहे. सुमारे ४० वर्षांनंतर बोफोर्स प्रकरणाने पुन्हा डोके वर काढले आहे.

आता ऑटोव्हिओ कात्रोची गेलाच आहे. तेव्हा हे प्रकरण न्यायालयाच्या दृष्टीनेही थंड्या बस्त्यात गेले आहे. पण जयराम रमेश यांच्या लेखाच्या निमित्ताने त्या थंड्या बस्त्यावरील धूळ झटकली गेलीय आणि त्याचा भपकारा मोदींपेक्षा गांधी कुटुंबीयांसाठीच झोंबणारा ठरतोय. म्हणूनच बोफोर्सची कोरोनाशी तुलना मोदींपेक्षा गांधी कुटुंबीयांना अस्वस्थ करणारी ठरली आहे. रमेश यांच्यासारख्या हुषार नेत्याचा हाच तर हेतू नसेल ना…?? या मागची प्रेरणा नेमकी कोणाची असेल…?? विचार करावेत असे प्रश्न आहेत…!! उत्तरे मिळतील की नाही माहिती नाही…!!

Who the real target of jairam ramesh in bofors argument?

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात