ब्रिटनच्या तरुण पिढीला राजेशाही संपुष्टात आणण्याची इच्छा, सर्वेक्षणातून स्पष्ट कल

British Survey Suggest Young Generation Wants To end Monarchy in Britain

Young Generation Wants To end Monarchy in Britain : ब्रिटनमध्ये शुक्रवारी झालेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, तेथील तरुणांना आता राजेशाही परंपरा संपुष्टात आणण्याची इच्छा आहे. त्यांना निवडून आलेला प्रमुख हवा आहे. YouGovच्या सर्वेक्षणानुसार 18 ते 24 वर्षे वयोगटातील 41% लोकांना राजेशाही संपुष्टात आणायची आहे. तर 31% लोकांना असे करण्याची इच्छा नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी ही आकडेवारी वेगळी होती. तेव्हा 46% लोक राजेशाहीच्या समर्थनात होते आणि केवळ 26% लोक हे बदलू इच्छित होते. British Survey Suggest Young Generation Wants To end Monarchy in Britain


वृत्तसंस्था

लंडन : ब्रिटनमध्ये शुक्रवारी झालेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, तेथील तरुणांना आता राजेशाही परंपरा संपुष्टात आणण्याची इच्छा आहे. त्यांना निवडून आलेला प्रमुख हवा आहे. YouGovच्या सर्वेक्षणानुसार 18 ते 24 वर्षे वयोगटातील 41% लोकांना राजेशाही संपुष्टात आणायची आहे. तर 31% लोकांना असे करण्याची इच्छा नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी ही आकडेवारी वेगळी होती. तेव्हा 46% लोक राजेशाहीच्या समर्थनात होते आणि केवळ 26% लोक हे बदलू इच्छित होते.

ब्रिटिश राजघराणयाला त्यांच्या इतिहासाची माहिती विलियम द काँकररपासून झाली. त्याने 1066 मध्ये इंग्लंडवर आक्रमण केले होते. एप्रिल 2021 मध्ये महाराणीचे 99 वर्षीय पती प्रिन्स फिलिप यांचा मृत्यू आणि एलिझाबेथ यांचे नातू प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन यांची अमेरिकन चॅट शोमधील मुलाखत राजघराण्यासाठी अडचणीची ठरली आहे. आता पुन्हा एकदा राजेशाही संपुष्टात आणण्याचा हा मुद्दा या राजघराण्यासाठी त्रासदायक ठरू शकतो.

हॅरी आणि मेघन यांना तरुणाईची पसंती

मागच्या सर्वेक्षणात तरुण पिढीने हॅरी आणि मेघन यांना पसंती दर्शवली होती. त्यांच्याबद्दल सकारात्मकता दर्शविली होती. त्यावेळेस 4870 प्रौढांच्या सर्वेक्षणात असे आढळले होते की, 25 ते 49 वयोगटातील 53% लोकांनी राजेशाहीचे समर्थन केले होते.

65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे राजेशाहीच्या बाजूने

त्याचवेळी 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 81% लोकांनी राजेशाहीचे समर्थन केले. त्यांच्या मते बिटनची राजघराण्याची परंपरा पुढेही चालवली जावी.

British Survey Suggest Young Generation Wants To end Monarchy in Britain

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती