जगभरात कोरोना मृत्यूंची संख्या प्रत्यक्षात दुप्पट असल्याची WHO ची भीती; १८ नव्हे, ३० लाख रुग्णांच्या मृत्यूची शक्यता

WHO Says Covid-19 death toll reported to be very low, actual number may be doubled

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी म्हटले की, कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये जगभरात किमान 30 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. कोरोना मृत्यूंची अधिकृत जाहीर केलेला आकडा 18 लाखांच्या दुपटीजवळ आहे. WHO Says Covid-19 death toll reported to be very low, actual number may be doubled


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी म्हटले की, कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये जगभरात किमान 30 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू (Covid-19 death toll) झाल्याचा अंदाज आहे. कोरोना मृत्यूंची अधिकृत जाहीर केलेला आकडा 18 लाखांच्या दुपटीजवळ आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोना विषाणूमुळे थेट किंवा अप्रत्यक्षपणे आपला जीव गमावलेल्या लोकांची संख्या ‘अत्यंत कमी’ दर्शवण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य सांख्यिकी अहवालात, WHO ने म्हटले आहे की, 31 डिसेंबर 2020 पर्यंत जगभरात 8 कोटी 20 लाखांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि 18 दशलक्षांहून अधिक लोक मरण पावले होते. परंतु प्राथमिक अंदाजानुसार, 2020 मध्ये कोरोनामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या 30 लाख लोकांचा मृत्यू झाला. हा आकडा विविध देशांनी जागतिक आरोग्य संघटनेला दिलेल्या आकडेवारीपेक्षा 12 लाखांनी जास्त आहे.

अहवालानुसार, जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) कोरोना महामारीतील मृतांची ताजी संख्या 33 लाख सांगण्यात आली आहे. 2020 साठी करण्यात आलेल्या अनुमानानुसार कोरोनामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे झालेल्या मृत्यूंची संख्या कमी सांगण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अशी शंका घेण्याचे कारण म्हणजे, अनेक देशांनी कोरोनाचा डेटा नीट ठेवला नाही, अनेक ठिकाणी अंदाजपंचे आकडेवारी देण्यात आली. याशिवाय महामारीच्या सुरुवातीला कोरोना संसर्गाबरोबरच आधीच्याच इतर आजारांमुळे गुंतागुंत वाढली आणि रुग्णांचा मृत्यू झाला होता. अशा रुग्णांच्या नोंदींविषयी सुरुवातीला संभ्रम होता. यामुळेही प्रत्यक्ष मृत्यूंचा आकडा हा वास्तवातील संख्येपेक्षा मोठा असल्याचे म्हटले जात आहे.

WHO Says Covid-19 death toll reported to be very low, actual number may be doubled

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था