रमेश जारकीहोळी यांना खंडणी प्रकरणात अडकविण्यासाठी ब्लॅकमेल, एसआयटीच्या तपासात उघड

विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : भाजपाचे आमदार रमेश जारकीहोळी यांना खंडणी प्रकरणात अडकविण्यासाठी ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने एका महिलेसोबत गुप्तपणे तिच्या लैंगिक संबंधांचे चित्रीकरण करण्याचा कट रचला जात असल्याचे पुरावे विशेष तपास पथकाला सापडले आहेत.Blackmail to implicate Ramesh Jarkiholi in ransom case, revealed in SIT probe

बंगळुरू पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) भाजपचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचा समावेश असलेल्या लैंगिक सीडी प्रकरणाची चौकशी पूर्ण केली आहे. एका महिलेने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे . भारतीय जनता पक्षाचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या सीडीचा तपास विशेष तपास पथकाने (एसआयटी) पूर्ण केला आहे.



चौकशीत निष्पन्न झाले आहे की या महिलेने प्रारंभी जलसंपदा मंत्री असलेल्या जारकीहोळी यांच्याशी संपर्क साधला होता. राज्यातील धरणाचे व्हिडीओ शूट करण्याची परवानगी मागितली. यानिमित्ताने जारकीहोळी यांच्याशी जवळीक साधली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसआयटीला महिलेने दाखल केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या खटल्याचा पुरावा मिळालेला नाही. परंतु या महिलेवर आणि भाजपच्या आमदारांच्या खंडणीत सहभागी असलेल्या दोन जणांवर खटला भरण्यासाठी पुरावा सापडला आहे.

एसआयटीने लैंगिक अत्याचार प्रकरणात बी अहवाल किंवा क्लोजर रिपोर्ट आणि खंडणी प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. लैंगिक अत्याचाराच्या कथित खटल्याच्या चौकशीत तपासात महिलेने तिच्यावर लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यासाठी सरकारी नोकरीची ऑफर केल्याचा दावा केला होता.

या महिलेच्या म्हणण्यानुसार महिलेने मंत्रिपदावर नोकरी मागितल्याचा पुरावा तपासात सापडला नाही. ती अभियांत्रिकी पदवीधर नव्हती. महाविद्यालयात तिच्या दुसऱ्या वर्षीच शिक्षण सोडून दिले होते.या महिलेच्या घरात तपासात एक मिनी कॅमेऱ्या चा बॉक्स सापडला आहे.

लैैंगिक संबंधांचे चित्रीकरण करण्यासाठी तो वापरला होता. त्याचबरोबर या महिलेने वापरलेला मोबाइल फोन अन्य दोन संशयित नरेश गौडा याचा होता. या दोघांनी महिलेला कटात अडकविले होते. प्रत्येक वेळी ही महिला जारकीहोळी यांना भेटायला गेल्यावर हे संशयित सभोवती असत..बलात्काराच्या आरोपावरून यावर्षी मार्च महिन्यात भाजपा सरकारमधून जारकीहोळी यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पडले होते.

Blackmail to implicate Ramesh Jarkiholi in ransom case, revealed in SIT probe

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात