विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) गठीत केलेल्या स्वतंत्र समितीने मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) भारत स्टेज ३ (बीएस- ३) वाहनांच्या प्रवेशावर आणि चालण्यावर पूर्ण बंदी घालण्याची शिफारस केली आहे. मुंबईतील वाहनांच्या प्रदूषणाविषयी उपाययोजनेसाठी या समितीची स्थापना गेल्या नोव्हेंबरमध्ये करण्यात आली होती.Complete ban on BS-3 vehicles in Mumbai metropolitan region, cof Maharashtra Pollution Control Board Committee
आंतरराज्य टॅक्सी आणि मालवाहू मोटारींच्या व्यावसायिक वाहनांवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. समितीचा अहवाल जूनमध्ये सादर करण्यात आला होता आणि अन्य विभागांच्या शिफारशींची प्रतीक्षा करीत आहे.
सर्व व्यावसायिक आणि पर्यावरणीय बाबींचा विचार करून राज्य सरकार निर्णय घेईल.माजी अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) सतीश सहारबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांच्या समितीने सुचविलेल्या उपाययोजनांच्या विस्तृत यादीचा हा भाग होता.
समितीमध्ये एमपीसीबी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (पुणे), सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (दिल्ली), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-बॉम्बेचे प्रतिनिधी आणि स्वतंत्र तज्ञ यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App