‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा नवा नारा!

भाजपने राज्य, लोकसभा आणि विधानसभा स्तरावरील निमंत्रक आणि सहसंयोजकही निश्चित केले

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीची देशभरात तयारी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष सभांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखत आहेत. दरम्यान, देशातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्षाने 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन आपला नारा निश्चित केला आहे. BJPs new slogan for Lok Sabha elections

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत भाजप यावेळी ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’, असा नारा वापरून जनमत गोळा करणार आहे.


राजस्थानमध्ये 199 जागांवर 74.96 टक्के पेक्षा जास्त मतदान; BJP उमेदवारावर हल्ला; बूथ कॅप्चरची घटना


विशेष म्हणजे भाजपने राज्य, लोकसभा आणि विधानसभा स्तरावरील निमंत्रक आणि सहसंयोजकही निश्चित केले आहेत. 2024 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीम, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा लवकरच संपूर्ण देशाचा दौरा करणार आहेत.

मंगळवारी (२ जानेवारी) नवी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत ही घोषणा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पक्षाचे सरचिटणीस सुनील बन्सल, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव आणि मनसुख मांडविया यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते.

BJPs new slogan for Lok Sabha elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात