विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 6 राज्यांच्या 7 विधानसभा पोटनिवडणूकीचे निकाल आज लागल्यानंतर मराठी माध्यमांनी जरी फक्त अंधेरी पोटनिवडणुकीच्या शिवसेनेच्या विजयाचा गाजावाजा केला असला, तरी देशात मात्र इतर राज्यांमध्ये भाजपचाच डंका वाजल्याचे दिसून आले आहे. BJP’s fight is only with regional parties; Where is the Congress?
या पोटनिवडणुका फक्त 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये झाल्या असल्या, तरी त्यांची व्याप्ती मोठी होती. कारण ते मतदारसंघ 6 राज्यांमध्ये पसरलेले होते. हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, बिहार आणि तेलंगण या राज्यांमध्ये या निवडणुका झाल्या. यापैकी महाराष्ट्र, बिहार आणि तेलंगणा वगळता इतरत्र भाजपला यश मिळाले. त्यातही बिहारचा गोपालगंज मतदारसंघ राष्ट्रीय जनता दलाकडून भाजपने खेचून घेतला.
ओडिशातील धामनगर मध्ये बिजू जनता दलाचे वर्चस्व भेदून भाजपने विजय मिळवला. महाराष्ट्रात अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विजय मिळवला असला तरी तो 35 % च्या आतला विजय आहे. कारण तिथे मूळात एकूण मतदानच 31.74 % झाले होते.
या पोटनिवडणुकांच्या निकालांचा अन्वयार्थ वेगळ्या प्रकारेही लावला पाहिजे. कारण 6 राज्यांमध्ये भाजपची टक्कर प्रादेशिक पक्षांची झाली. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाशी, बिहारमध्ये राष्ट्रीय जनाचा दलाशी, ओडिशात बिजू जनता दलाशी, तेलंगणात तेलंगण राष्ट्र समितीशी भाजपचे उमेदवार भिडले. अंधेरी पूर्व मध्ये भाजप उमेदवाराने माघारच घेतल्याने भले मराठी माध्यमांनी त्या लिटमस टेस्टचा विजय शिवसेनेच्या खात्यावर जमा केला असेल, पण भाजपने येथे आव्हान उभे केले नव्हते, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
BJP – NCP Alliance : जखमा उरातल्या; मीठ राष्ट्रवादीचे; चोळतायत अशिष शेलार!!
या सर्व पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाचे अस्तित्वच कुठे जाणवले नाही. वास्तविक तेलंगणामध्ये खासदार राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेद्वारे मोठी राजकीय वातावरण निर्मिती केली आहे. पण या वातावरण निर्मितीचा पोटनिवडणुकीच्या निकालावर काहीही परिणाम झाला नाही. तसा परिणाम कर्नाटक मधल्या पोटनिवडणुकींमध्ये देखील 15 दिवसांपूर्वी झालेला दिसला नव्हताच.
तेथेही भाजपने काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलावर मात केली होती. याचा अर्थ असा की भाजपची खरी राजकीय लढत प्रादेशिक पक्षांचीश आहे. काँग्रेसला आता फारसे राजकीय स्थान या लढतीत उरलेले दिसत नाही आणि जर उरले असेलच तर ते प्रादेशिक पक्षांबरोबरच्या लढाईत गमावलेलेही दिसून येते. भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी या विषयावर मंथन केले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App