महाराष्ट्रात मोठी नोकर भरती; आरोग्य खात्यात 10568 जागा, तर ग्रामविकास मध्ये 11000 जागा


प्रतिनिधी

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील राज्यभरातील 75000 रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विविध खात्यांमध्ये काही हजारांमध्ये भरती होणार आहे ग्राम विकास खात्यात 11000 पेक्षा जास्त जागा तर आरोग्य खात्यात 10568 जागांची भरती होणार आहे. Big job recruitment in Maharashtra; 10568 seats in health department

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत नुकतीच 75000 पदांपैकी 2000 जणांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीची प्रमाणपत्रे देण्यात आली. महाराष्ट्रात सर्व विभागीय कार्यालयांमध्ये याचे कार्यक्रम झाले.

आता गृहविभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल व वन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग या जागांसाठी लवकरच भरती निघणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शासनाच्या 29 विभागातील 75000 पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे.

कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने नोकरभरतीवर निर्बंध आणले होते. परंतु आता कोरोना काळ संपल्यावर शिंदे-फडणवीस सरकारने ही मर्यादा उठवली आहे. त्यामुळे १०० टक्के नोकर भरती होणार आहे.


Government Job : बरोजगार तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, राज्य विमा महामंडळात 151 जागांवर भरती, अशी आहे ऑनलाइन प्रोसेस


कोणत्या विभागात अंदाजित किती नोकर भरती होणार ?

  • आरोग्य खाते : १० हजार ५६८
  • गृह खाते : १४ हजार ९५६
  • ग्रामविकास खाते : ११ हजार
  • कृषी खाते : २ हजार ५००
  • सार्वजनिक बांधकाम खाते : ८ हजार ३३७
  • नगरविकास खाते : १ हजार ५००
  • जलसंपदा खाते : ८ हजार २२७
  • जलसंधारण खाते : २ हजार ४२३
  • पशुसंवर्धन खाते : १ हजार ४७
  • किती जागा रिक्त ?
  • गृहविभाग : ४९ हजार ८५१
  • सार्वजनिक आरोग्य विभाग : २३ हजार ८२२
  • जलसंपदा विभाग : २१ हजार ४८९
  • महसूल आणि वनविभाग : १३ हजार ५५७
  • वैद्यकीय शिक्षण विभाग : १३ हजार ४३२
  • सार्वजनिक बांधकाम विभाग : ८ हजार १२
  • आदिवासी विभाग : ६ हजार ९०७
  • सामाजिक न्याय विभाग : ३ हजार ८२१

Big job recruitment in Maharashtra; 10568 seats in health department

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात