मशाल पेटली, अंधेरी जिंकली; पण विजयात मुस्लिम मतांचा वाटा असेल तर…


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाल्यानंतर पक्षाच्या गोटात जल्लोष आहे. मशाल पेटली अंधेरी जिंकली अशा घोषणा उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक देत आहेत. Muslim votes for Shivsena Uddhav Balasaheb Thackeray party is loss of Congress but hindu voters Consolidation will benefit BJP

मशाल पेटली आणि अंधेरी जिंकली, हे तर खरंच आहे. पण हा विजय मुळातच 35 % च्या आतला आहे. कारण अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील मतदानाची टक्केवारी 31.74 % एवढीच आहे. 6 राज्यांमधल्या 7 विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये अंधेरीतली एकूण मतदानाची टक्केवारी सर्वात कमी आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा विजय हा 35 % च्या आत मधला आहे.शिवसेनेचा पॉलिटिकल शिफ्ट

पण यापेक्षाही या विजयाचे विश्लेषण करताना अनेक विश्लेषकांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पॉलिटिकल शिफ्ट हा हिंदुत्वाकडून धर्मनिरपेक्षतेकडे झाल्याचे विश्लेषण केले आहे. त्यामुळे अंधेरी सारख्या कॉस्मोपोलिटीन मतदारसंघात अल्पसंख्यांक मुस्लिमांची मते देखील शिवसेनेच्या उमेदवाराकडे वळल्याचे दिसून आले आहे. जो मुस्लिम मतदार बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेची फटकून वागत होता, त्या मतदाराने अंधेरीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पारड्यात आपली मते टाकली आहेत, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे.

आता विश्लेषकांचे हे म्हणणे खरे मानले, तर मग हिंदुत्व पासून दूर गेलेल्या शिवसेनेकडे मुस्लिमांची मते वळली हे मान्य करावे लागेल. पढ हे उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिक मान्य करणार आहेत का??, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मातोश्रीवर अनेक लिबरल विचारवंत, कम्युनिस्ट पक्षाचे नेते, संभाजी ब्रिगेड इतकेच काय, तर काही मुस्लिम संघटनांचे नेते देखील जाऊन आले आहेत. एवढेच नव्हे तर मराठा सेवा संघासारखे नाव धारण करणाऱ्या मुस्लिम मराठी सेवा संघाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जाहीर पाठिंबा देखील दिला आहे.

या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंधेरीतल्या विजयात मुस्लिम मतांचा वाटा मोठा राहिल्याचे दिसत असेल… तर हा खऱ्या अर्थाने राजकीय धोका कोणाला आहे?? शिवाय मुस्लिम मते जर त्या पक्षाकडे वळणार असतील तर हिंदू मतांचे ध्रुवीकरण कोणत्या पक्षाकडे होईल??, हे सांगण्यासाठी फार मोठ्या अभ्यासाची गरज नाही. पण विश्लेषकांनी त्यांच्या विश्लेषणातून हा मुद्दा चतुराईने वगळलेला दिसतो आहे.

काँग्रेसचे वर्चस्व आणि पतन

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर यासारख्या महापालिकांच्या पट्ट्यामध्ये मुस्लिम मते शिवसेनेकडे वळणे याचा खरा धोका काँग्रेस सारख्या पक्षाला आहे. तो आगामी महापालिका निवडणुकांमध्ये अधिक ठळक होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस पक्षाची या सर्व पट्ट्यामध्ये विशिष्ट ताकद आहे आणि त्या ताकदीमध्ये मुस्लिम मतांचा मोठा वाटा राहिल्याचे दिसते. 2014 पूर्वीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा आकडेवारीनिशी आढावा घेतला तर ही बाब अधिक स्पष्ट होते. कारण 2009 ते 2014 आणि त्याआधी देखील 2004 ते 2009 मुंबईमध्ये सर्वच्या सर्व लोकसभा जागांवर म्हणजे 6 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. विधानसभेत देखील त्या पक्षाचे 14 पेक्षा जास्त आमदार होते. याचा सरळ अर्थ असा की काँग्रेस पक्षाचा मुंबई आणि त्या पट्ट्यातला प्रभाव यामध्ये मुस्लिम मतांचा वाटा मोठी दखल घेण्याजोगा आहे. आणि ती मुस्लिम मते जर अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे वळणार असतील तर यातून धोका उत्पन्न होतो तो काँग्रेसलाच. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद येथे तशाही अर्थाने तोळामासाच आहे.

याचा दुसरा अर्थ असा की जर मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे होणार असेल, तर काँग्रेसला फटका आणि हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपला फायदा!! भाजपने अंधेरीच्या पोटनिवडणुकीत माघार घेऊन एक प्रकारे शिवसेनेला फुलटॉस टाकला होता. शिवसेनेने त्यावर षटकार जरूर मारला, पण झेल मात्र काँग्रेसचा गेला असेच म्हणावे लागेल!!

Muslim votes for Shivsena Uddhav Balasaheb Thackeray party is loss of Congress but hindu voters Consolidation will benefit BJP

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण