भ्रष्टाचाराच्या मुद्य्यावरून बिजू जनता दलाला कोंडीत पकडले
विशेष प्रतिनिधी
पुरी : पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशातील पुरी येथे मोठा दावा केला. पुरी येथे त्यांनी भाजप उमेदवार संवित पात्रा यांच्या समर्थनार्थ रोड शो केला. येथे रोड शो केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ढेंकनालमध्ये रॅली काढली. रॅलीला संबोधित करताना त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्ष बिजू जनता दलावर (बीजेडी) जोरदार निशाणा साधला.BJPs double engine government will form in Odisha on June 10 PM Modi claims
मोदी म्हणाले की बीजेडी सरकार पूर्णपणे भ्रष्टाचाऱ्यांच्या ताब्यात आहे. भ्रष्ट मुख्यमंत्र्यांनी निवासस्थान आणि कार्यालयावर कब्जा केल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. तसेच, बीजेडीवर ओडिशाची संपत्ती आणि संस्कृती नष्ट केल्याचा आरोप केला आहे. बीजेडी सरकारमध्ये जगन्नाथ मंदिरही सुरक्षित नाही, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच भाजपच्या डबल इंजिन सरकारचा शपथविधी सोहळा 10 जून रोजी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
रॅलीला संबोधित करताना मोदी म्हणाले, “बीजेडी सरकारच्या काळात जगन्नाथजी मंदिरही सुरक्षित नाही. श्री रत्न भंडारची किल्लीही गेल्या सहा वर्षांपासून माहीत नाही. यामागचे मोठे रहस्य बीजेडी सरकार आणि त्यांच्या लोकांच्या जवळ आहे. मुख्यमंत्र्यांनी ते लपवून ठेवले आहे. बीजेडीने दडपलेल्या तपासाच्या अहवालात काय आहे हे जाणून घ्यायचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App