विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील घटनेवरून कॉँग्रेसने राजकारण सुरू केले आहे. अनेक नेते याठिकाणी भेट देत आहेत. मात्र, राजस्थानात एका दलीत तरुणाच्या हत्येवरून भारतीय जनता पक्षाने कॉँग्रेसला आरसा दाखविला आहे.BJP lashes out at Congress over killing of Dalit youth in Rajasthan, The accused were not arrested, no leader showed any sensitivity to visit
या तरुणाच्या हत्येतील आरोपींना अद्याप अटक तर झालेली नाहीच पण कॉँग्रेसच्या एकाही नेत्याने त्याठिकाणी भेट देण्याची संवेदनशिलता दाखविली नाही अशी टीका भाजपने केली आहे.कॉँग्रेसने आपल्या सर्व नेत्यांना लखीमपूर खीरीयेथे उतरविले आहे. मात्र,राजस्थानातील घटनेवर कोणीही बोलायला तयार नाही.
भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले, कॉँग्रेसचे अनेक नेते लखीमिपूर खीरी येथे येत आहेत. मात्र, त्यांची वक्तव्ये पाहिल्यावर दिसून येते की त्यांना पीडित कुटुंबाबाबत कोणतीही सहानुभूती नाही. ते केवळ राजकारण करण्याची संधी शोधत आहेत. मात्र, कॉँग्रेसच्या याच नेत्यांना राजस्थानातील दलीत तरुणांच्या हत्येशी देणेघेणे नाही. त्यांना त्याबाबत कोणतीही संवेदनशिलताही नाही.अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेलीनाही.
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना भाटिया म्हणाले, उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या शासनकाळात खºया अर्थाने जंगलराज पाहायला मिळाले. एका डीसपीची हत्या करण्यात आली होती. लखीमपूर खीरी येथेच एका पत्रकाराला जीवंत जाळण्यात आले होते. मात्र, आरोपींवर कारवाई करण्यात आली नाही. याउलट योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने कोणताही भेदभाव न करता आरोपींवर कारवाई केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App