माणिके मागे हिथे फेम सिंगर योहानी झळकणार बिग बॉस 15 शो मध्ये


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बिग बॉसच्या शनिवारच्या शोमध्ये बिग बॉसचा होस्ट सलमान खान बिग बॉसच्या घरातील सर्वांना काेणत्या ना काेणत्या कारणावरून ओरडताना दिसून येतो. पण या सर्व ओरडाओरडी मध्ये एक सुखद गोष्ट या शनिवारी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मणके मागे हिथे या गाण्यामुळे रातोरात स्टार झालेली श्रीलंकन सिंगर योहानी आता बिग बॉसच्या शोमध्ये दिसणार आहे.

Manike mage hithe fame singer will be seen in big boss 15

योहानी प्रथमच इंडियन टेलिव्हिजनवर झळकणार आहे. या एपिसोडचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये योहानी अभिनेता सलमान खानला मानिके मागे हिथे हे गाणे गायला शिकवत आहे असे दिसून येतेय. सलमानने हे गाणे गाण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला काही हे गाणे गाता आले नाही.


रानू मंडल! श्रीलंकन गायिका योहाणीच्या ‘माणिके मागे हिथे’ गाण्यामूळे होताहेत पुन्हा व्हायरल


योहाणीचे मानीके मागे हिथे हे गाणे भारतामध्ये प्रचंड व्हायरल झाले होते. इन्स्टाग्रामवर रिल्स पासून ते बरेच व्हिडिओ बनवण्यासाठी हे गाणे वापरले जात होते. बऱ्याच सेलिब्रेटींनीवरही या गाण्याने जादू केली होती. सुपरस्टार माधुरी दिक्षितनेही या गाण्यावर एक सुंदर रील बनवून शेअर केला होता. तर इतक्या प्रसिध्द गाण्याची सिंगर कोण हा प्रश्न सर्वांना पडला असणार. तर योहानी आता लवकरच बिग बॉस या शो मध्ये झळकणार आहे.

Manike mage hithe fame singer will be seen in big boss 15

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण