खासदार कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केले होते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील मंडी येथीलल भाजप खासदार कंगना रणौत ( Kangana Ranaut ) यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या वक्तव्यावर देशभरात खळबळ उडाली आहे. कंगनाच्या या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. दरम्यान, भाजपनेही कंगनाच्या वक्तव्यापासून दुरावा केला आहे.
कंगनाच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने असहमती व्यक्त केली आहे. कंगनाचे वक्तव्य हे पक्षाचे मत नसल्याचे भाजपने म्हटले आहे. तसेच कंगना रणौतला धोरणात्मक मुद्द्यांवर विधाने करण्याचा अधिकार नाही. त्यांच्या विधानाला पक्ष समर्थन देत नाही. असंही भाजपने स्पष्ट केलं आहे.
खासदार कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केले होते. शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार आणि हत्या करण्यात आल्याचे कंगनाने सांगितले होते. विधेयक मागे घेतले हे चांगले आहे. अन्यथा बांगलादेशाप्रमाणे आंदोलनातही दीर्घ नियोजन करण्यात आले होते. देशात एखादी मोठी घटना घडवण्याचा कट रचला जात होता. यामागे चीन, अमेरिका यांसारख्या परकीय शक्ती कार्यरत आहेत. असं कंगना म्हणाल्या होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App