छत्तीसगडसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी; तीन खासदारांना तिकीट

राजनांदगावमधून रमण सिंह रिंगणात

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. तर माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह राजनांदगावमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपाने जाहीर केलेल्या यादीत तीन खासदारांसह 9 महिलांना विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले आहे. दुसऱ्या यादीत भाजपाने मंत्री आणि खासदार रेणुका सिंह यांना भरतपूर सोहनतमधून उमेदवारी दिली आहे.  BJP announces second list of candidates for Chhattisgarh Tickets for three MPs

भाजपाने जाहीर केलेल्या यादीत एकूण 64 उमेदवारांचा समावेश आहे. रेणुका सिंह यांच्याशिवाय पक्षाने ज्या तीन खासदारांना उमेदवारी दिली आहे त्यात गोमती साई आणि अरुण साओ यांचा समावेश आहे. गोमती साई पाथळगावमधून तर अरुण साओ लोर्मी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने पुन्हा एकदा जुन्या नेत्यांवर विश्वास व्यक्त केला असून अनेक माजी मंत्र्यांना तिकीटही दिले आहे.

यामध्ये माजी मंत्री ननकीराम कंवर रामपूरमधून, धरमलाल कौशिक बिल्हामधून, अमर अग्रवाल बिलासपूरमधून, राजेश मुनत हे रायपूर नगर पश्चिममधून, ब्रिजमोहन अग्रवाल हे रायपूर नगर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह पुन्हा एकदा राजनांदगावमधून निवडणूक लढवणार आहेत. राजनांदगाव विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. रमणसिंग गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवर विजयी होत आहेत.

BJP announces second list of candidates for Chhattisgarh Tickets for three MPs

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात