caste based census : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 11 राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाने सोमवारी जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 11 वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि जातनिहाय जनगणनेबाबत त्यांची भूमिका मांडली. साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात 11 राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळांची बैठक झाली. Bihar cm nitish kumar met pm narendra modi with demand for a caste based census
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 11 राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाने सोमवारी जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 11 वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि जातनिहाय जनगणनेबाबत त्यांची भूमिका मांडली. साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात 11 राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळांची बैठक झाली.
The prime minister listened to all members of the delegation on caste census in the state. We urged the PM to take an appropriate decision on it. We briefed him on how resolutions have been passed twice in the state assembly on caste census: Bihar CM Nitish Kumar in Delhi pic.twitter.com/Qz0RzcPNdk — ANI (@ANI) August 23, 2021
The prime minister listened to all members of the delegation on caste census in the state. We urged the PM to take an appropriate decision on it. We briefed him on how resolutions have been passed twice in the state assembly on caste census: Bihar CM Nitish Kumar in Delhi pic.twitter.com/Qz0RzcPNdk
— ANI (@ANI) August 23, 2021
जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी राज्यातील जनगणनेवर शिष्टमंडळाच्या सर्व सदस्यांचे ऐकून घेतले. आम्ही पंतप्रधानांना यावर योग्य निर्णय घेण्याची विनंती केली. नितीशकुमार म्हणाले की, आम्ही अगदी सुरुवातीपासूनच जातीवर आधारित जनगणनेबद्दल बोलत आलो आहोत. केवळ बिहारमध्येच नाही तर देशभरातील लोक याचा विचार करतात. या दृष्टिकोनाबाबत आम्ही आमचा मुद्दा पंतप्रधान मोदींसमोर ठेवला.
पीएम मोदींना भेटल्यानंतर नितीशकुमार म्हणाले की, आम्ही सर्वांनी पंतप्रधानांना सर्व काही सांगितले आहे. आम्ही जातीच्या जनगणनेच्या बाजूने सर्व काही सांगितले आहे. त्यांनी सर्वांचे पूर्णपणे ऐकून घेतले आहे. प्रत्येकाने जातीच्या जनगणनेच्या बाजूने एक-एक बाब सांगितली. हे सर्व पंतप्रधान मोदींनी अत्यंत काळजीपूर्वक ऐकले आहे. आम्हाला आशा आहे की सकारात्मक परिणाम बाहेर येईल. नितीश म्हणाले की, जातिगणनेचा विचार करून निश्चितपणे निर्णय घेतला पाहिजे. आम्ही स्पष्टपणे सांगितले की, जर जातींची जनगणना झाली, तर सर्व जातींची खरी संख्या कळेल, मग त्यांच्या विकासासाठी योग्य निर्णय घेता येईल. दुसरीकडे, तेजस्वी यादव म्हणाले की, बिहारमधील सर्व पक्ष राष्ट्रहितासाठी एकत्र आले आहेत.
Delhi | Our delegation met the PM today not only for caste census in the state (Bihar) but in the entire country. We are awaiting a decision on this now: Tejashwi Yadav, RJD after meeting with PM Modi over caste census pic.twitter.com/HRyg77P3D5 — ANI (@ANI) August 23, 2021
Delhi | Our delegation met the PM today not only for caste census in the state (Bihar) but in the entire country. We are awaiting a decision on this now: Tejashwi Yadav, RJD after meeting with PM Modi over caste census pic.twitter.com/HRyg77P3D5
मुख्यमंत्री नितीश यांच्यासह पंतप्रधानांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात 11 पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. सीएम नितीश, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, जेडीयूचे विजयकुमार चौधरी, भाजपचे जनक राम, काँग्रेसचे अजित शर्मा, सीपीआय एमएलचे मेहबूब आलम, एआयएमआयएम अख्तरुल इमान, हमचे जीतन राम मांझी, व्हीआयपीचे मुकेश साहनी, सीपीआयचे सूर्यकांत पासवान आणि सीपीआय (एम) चे अजय कुमार, या नेत्यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
Bihar cm nitish kumar met pm narendra modi with demand for a caste based census
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App