GSTवर मोदी सरकारला मोठे यश, संकलनाच्या आकडेवारीने बनवला खास विक्रम

GST new

देशातील जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेल्याची ही पाचवी वेळ आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. काही दिवसांपूर्वीच स्वातंत्र्यदिनी, पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून घोषणा केली होती की, लवकरच देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर येईल. ही भविष्यवाणी  पंतप्रधानांनी असेच केलेले नाही. पहिल्या तिमाहीतील जीएसटीच्या आकडेवारीने याची पुष्टी केली आहे. Big success for Modi Govt on GST collection figures set a special record

उत्पादन आकडेवारी दर्शवते की जीडीपीचे आकडे दुसऱ्या तिमाहीत 10 टक्क्यांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. जीएसटीचे जे आकडे आता समोर आले आहेत ते विलक्षण आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी जीएसटीचे आकडे चांगले आले आहेत. यावेळी ही वाढ 11 टक्क्यांहून अधिक आहे.

शुक्रवारी मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑगस्ट 2023 मध्ये जीएसटी महसूलात 11 टक्के वाढ झाली आहे. यावेळी हा आकडा पुन्हा 1.60  लाख कोटींहून अधिक झाला आहे. देशातील जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेल्याची ही पाचवी वेळ आहे. ऑगस्ट 2022मध्ये जीएसटी कलेक्शन 1,43,612 कोटी रुपये झाले होते.

जुलैमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी जीएसटी महसुलात 1.65 लाख कोटी रुपयांचे संकलन पाहिले. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 11 टक्क्यांनी अधिक आहे. जून महिन्यात जीएसटी संकलन 1,61,497 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर मे महिन्यात हा आकडा 1,57,090 कोटी रुपयांवर आला. एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन विक्रमी पातळीवर पोहोचले होते. आकडेवारीवर विश्वास ठेवला तर एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन 1.87 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते.

Big success for Modi Govt on GST collection figures set a special record

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात