बघेल यांनी सत्तेत राहून सट्टेबाजीचा खेळ खेळला आणि… असंही म्हणाले आहेत. Betting is the side business of Congress’s Baghel government.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ”मुख्यमंत्री बघेल यांनी सत्तेत राहून सट्टेबाजीचा खेळ खेळला आणि त्यातून कमावलेला पैसा विधानसभा निवडणुकीसाठी वापरला आहे,” असा आरोप भाजपा प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
याशिवाय, सट्टेबाजी हा काँग्रेसच्या बघेल सरकारचा साइड बिझनेस असून, बघेल यांनी छत्तीसगडच्या विकासाला बेटिंगवर पणाला लावले. अशी टीकाही आमदार दरेकर यांनी केली.
तसेच, ‘’सट्टेबाजीच्या ॲपचे प्रवर्तकांनी मुख्यमंत्री बघेल, यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याची धक्कादायक माहिती काल ‘ED’च्या तपासात उघड झाली. या घोटाळ्याला काँग्रेसच्या बघेल सरकारचा पाठिंबा आहे, असे भाजप पहिल्यापासून सांगत होती. आता हे बिंग फुटले असून, बघेल याना एकूण ५०८ कोटी रुपये देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे,” असे दरेकर यांनी सांगितले आहे .
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App