Mamata Banerjee : ‘कोलकाता पोलिस आयुक्तांना हटवा, मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावा’

Mamata Banerjee

बंगालच्या राज्यपालांचे मुख्यमंत्री ममतांना आदेश


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल सरकार आज (9 सप्टेंबर 2024) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  ( Mamata Banerjee ) यांच्या नेतृत्वाखाली राज्य सचिवालयात प्रशासकीय आढावा बैठक घेणार आहे, ज्यामध्ये ग्रामीण भागातील प्रकल्प आणि नागरिक-केंद्रित सेवांवर चर्चा केली जाईल. दरम्यान, बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममतांना तातडीची कॅबिनेट बैठक बोलावून आरजी कर मेडिकल कॉलेजच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचे आदेश दिले.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही बोस म्हणाले की, जर गरज असेल तर पोलीस आयुक्तांना हटवण्यात यावे. कारण त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी येत आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्य सचिव मनोज पंत यांनी बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांची भेट घेतली होती.

राज्यपाल म्हणाले की, कोलकाता पोलिस आयुक्त विनीत गोयल यांची बदली करण्याच्या लोकांच्या मागणीवर राज्य सरकारने निर्णय घ्यावा. चिंता व्यक्त करताना राज्यपाल सीव्ही बोस म्हणाले की, बंगाल सरकार जबाबदारीतून पळून जाऊ शकत नाही आणि राज्यात घडणाऱ्या चिंताजनक घटनांबाबत गप्प बसू शकत नाही. ते म्हणाले की, पश्चिम बंगाल सरकारने संविधान आणि कायद्याच्या नियमानुसार काम केले पाहिजे.

Bengal Governors order to Chief Minister Mamata

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात