Tehreek e Insaf : इस्लामाबादमध्ये ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ ‘च्या रॅलीवर गोळीबार

Tehreek e Insaf

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी निदर्शने सुरू होती.


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ ( Tehreek e Insaf  ) (पीटीआय) ने रविवारी काढलेल्या रॅलीत गदारोळ झाला. सरकारवर दबाव टाकण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान हा गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.

पीटीआयने या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला असून, सरकारने पक्षाचा आवाज दाबल्याचा आरोप केला आहे आणि परिस्थितीला अघोषित मार्शल लॉ म्हणून संबोधले आहे.



तर इस्लामाबादमधील या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. याठिकाणी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.

या घटनेवर इम्रानच्या पक्षाने म्हटले की, शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या पोलिसांना लाज वाटली पाहिजे. इस्लामाबादचे आयजी आणि सरकारने असे निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे. आज जनतेने सरकारला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Firing at a rally of Pakistan Tehreek e Insaf in Islamabad

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात