भीक मागा, चोरी करा, पण ऑक्सिजन द्या ; दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भीक मागा, चोरी करा पण ऑक्सिजन द्या, असा सल्ला देऊन दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले आहे. Beg, steal, but give oxygen; Delhi High Court advises Center

देशात कोरोनाचे तांडव सुरु आहे. दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलनं दिल्ली उच्च न्यायालयात ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना हा सल्ला दिला.



न्यायमूर्ती विपिन संघी आणि रेखा पाटील यांच्या खंडपीठासमोर मॅक्स हेल्थकेअरच्या याचिकेवर बुधवारी रात्री तातडीची सुनावणी घेण्यात आली. ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा होत असल्याची तक्रार मॅक्सनं केली होती. संध्याकाळी ८ वाजता सुनावणी सुरू झाली, तेव्हा मॅक्सनं फक्त ३ तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक असून ४०० रुग्णांचा जीव धोक्यात आल्याचं सांगितलं. रुग्णांपैकी २६२ रुग्ण कोरोनाचे असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

त्यावर न्यायालयाने लोकांचे जीव महत्वाचे असून काहीही करा पण लोकांना वाचवा, सरकारच्या स्त्रोतांमधून ऑक्सिजनची गरज भागत नसेल, तर सरकारने दुसऱ्या मार्गाने ऑक्सिजन पुरवठ्याची सोय करावी, असे म्हंटले आहे.

दरम्यान, केंद्राची बाजू मांडणारे अॅड. राजीव नायर यांनी दिल्लीच्या पटपडगंजमधल्या मॅक्स हेल्थकेअरसाठी २ हजार मॅट्रिक टन ऑक्सिजन पाठवला असल्याची माहिती न्यायालयाला दिली.

Beg, steal, but give oxygen; Delhi High Court advises Center

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात