क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा, टी-२० विश्वचषक भारतात होण्याची शक्यता धुसर, जय शाह यांचे स्पष्टीकरण

BCCI Secretary Jay Shah Says Due To COVID Situation We May Shift T20 World Cup Scheduled In India To UAE

T20 World Cup : या वर्षी सोळा संघांमधील टी-20 वर्ल्ड कप यूएईमध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान आयोजित केला जाऊ शकतो. आयपीएल-14च्या पुढे ढकललेले सामने यूएईमध्ये 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरदरम्यान आयोजित केले जातील आणि त्यानंतर विश्वचषक होईल, अशी शक्यता आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शनिवारी ही माहिती दिली. BCCI Secretary Jay Shah Says Due To COVID Situation We May Shift T20 World Cup Scheduled In India To UAE


वृत्तसंस्था

मुंबई : या वर्षी सोळा संघांमधील टी-20 वर्ल्ड कप यूएईमध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान आयोजित केला जाऊ शकतो. आयपीएल-14च्या पुढे ढकललेले सामने यूएईमध्ये 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरदरम्यान आयोजित केले जातील आणि त्यानंतर विश्वचषक होईल, अशी शक्यता आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शनिवारी ही माहिती दिली. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना ते म्हणाले, ‘देशातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे आम्ही भारतात होणाऱ्या टी -२० विश्वचषक यूएईमध्ये स्थलांतरित करू शकतो. आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. आमच्यासाठी खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेऊ.

गतवर्षी कोरोनाच महामारीमुळे जागतिक क्रिकेट कॅलेंडरमध्ये अडथळे आणल्यामुळे आयसीसीने-2020 विश्वकरंडक पुढे ढकलला. हा आधी ऑस्ट्रेलियामध्ये होणार होता. यानंतर हे निश्चित करण्यात आले की, २०२१ चे सत्र भारतात खेळवले जाईल, तर २०२२ चे सत्र ऑस्ट्रेलियामध्ये खेळवले जाईल.

पहिल्या फेरीत चार संघ पात्र ठरतील

माध्यमांच्या वृत्तानुसार, राऊंड -1 मध्ये 12 सामने होणार असून 8 संघ त्यात सहभागी होतील. यातील चार (प्रत्येक गटातील टॉप दोन) सुपर 12 साठी पात्र ठरतील. आठ संघांपैकी क्वालिफाइड चार संघ (बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी) पहिल्या आठ क्रमांकाच्या टी -20 संघात सामील होऊन सुपर 12 मध्ये प्रवेश करतील. पहिल्या फेरीत यूएईच्या जागेव्यतिरिक्त ओमानमध्येही स्पर्धा होईल आणि सुपर 12 सामन्यांसाठी यूएईच्या मुख्य मैदानावरील खेळपट्ट्यांना तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

सुपर -12 मध्ये 30 सामने

30 सामन्यांचा समावेश असलेला सुपर 12 फेज 24 ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. सुपर 12 मधील संघांना प्रत्येकी सहा गटांच्या दोन गटांत विभागले जाईल. जे यूएईच्या तीन ठिकाणी (दुबई, अबू धाबी आणि शारजाह) खेळल्या जातील. यानंतर तीन प्लेऑफ सामने, दोन उपांत्य फेरी आणि अंतिम सामने असतील.

BCCI Secretary Jay Shah Says Due To COVID Situation We May Shift T20 World Cup Scheduled In India To UAE

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात