कोलकातामध्ये बांगलादेशी खासदाराचा मृतदेह फ्लॅटमध्ये आढळला

पोलिसांना व्यक्त केला हत्येचा संशय Bangladeshi MP Anwarul Azim Anars body found in flat in Kolkata

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : बांगलादेशातील सत्ताधारी पक्ष अवामी लीगचे बेपत्ता खासदार अन्वारुल अझीम अनार यांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. ते उपचारासाठी भारतात आले होते आणि गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. यापूर्वी त्यांची शोधासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.

बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी सांगितले की, कोलकाता पोलिसांनी अन्वारुल यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वेळा खासदार राहिलेले अन्वारुल हे एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आले, जेथे ते कोणालातरी भेटायला गेले होते.

अझीम १२ मे रोजी कोलकाता येथे पोहोचला होते. तेव्हापासून त्याचा कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकला नाही. त्याचा फोनही १४ मेपासून बंद होता.

Bangladeshi MP Anwarul Azim Anars body found in flat in Kolkata

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात