विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हजारो बांगलादेशी मुस्लिमांनी भारतात घुसखोरी करून पुणे मुंबई गाठले. भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये बस्तान बसवले, पण हजारो बांगलादेशी हिंदू मात्र तिथला हिंसाचार असह्य झाल्यावर नदीच्या पाण्यात उभे राहून भारताकडे आश्रय मागत आहेत. किंबहुना बांगलादेशातील भयानक हिंसाचार आणि हिंदूंच्या शिरकाणानंतर त्या हिंदूंवर भारताकडे आश्रय मागण्याची ही परिस्थिती ओढवली आहे. (Bangladeshi Hindus)
बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार गेल्यानंतर जमाते इस्लामीच्या गुंडांनी बांगलादेशातल्या शेकडो गावांमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. त्यांची घरे दारे, मंदिरे जाळली. शेकडो महिलांवर बलात्कार केले. त्यामुळे भयभीत आणि संतप्त झालेले हिंदू भारताकडे आश्रय मागणीच्या स्थितीत येऊन ठेपले. बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या सीमेवरील कुजबिहार जिल्ह्यातील सीतालकुची इथल्या जलाशयात हजारो हिंदू कुटुंबीयांनी जय श्रीरामचे नारे देत भारताकडे आश्रय मागितला. परंतु भारताच्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ने त्यांना परत बांगलादेशातील रंगपुर जिल्ह्यातील त्यांच्या गावांमध्ये जायला सांगितले. बांगलादेशातील हिंदूंवरचे अत्याचार असह्य झाल्याने त्या हिंदूंनी भारतात आश्रय मागितला आहे. परंतु केंद्रातल्या मोदी सरकारने आणि पश्चिम बंगाल मधल्या ममता सरकारने त्यांच्या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही.
एकीकडे भारतातल्या वेगवेगळ्या सरकारच्या ढील्या धोरणामुळे लाखो बांगलादेशी मुस्लिम भारतात वेगवेगळ्या मार्गांनी घुसले. ते थेट पुणे – मुंबई पर्यंत पोहोचले. तिथे त्यांनी आपले बस्तान बसवले. भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये घुसखोरी केली. काही बांगलादेशी मुस्लिम घुसखोर तर थेट दहशतवादी बनले. अनेक दहशतवादी घातपाती कारवायांमध्ये बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांना अटक देखील झाली आहे. भारतातल्या वेगवेगळ्या सरकारांना मुस्लिम घुसखोरी आटोक्यात आणता आली नाही. मोदी सरकारने शेकडो किलोमीटरच्या सीमेवर तारांचे कुंपण घालून बांगलादेशी मुस्लिम घुसखोरी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीदेखील घुसखोरी होतच राहिली.
या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील हिंसक सत्तांतराच्या काळात हिंदूंवर अत्याचार झाले अत्याचारीत आणि पीडित हिंदू भारताकडे आश्रय मागत आहेत. यावर मोदी सरकार नेमका काय निर्णय घेणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App