Sheikh Hasina : बांगलादेशातील बिघडलेली परिस्थिती पाहून शेख हसीना यांनी देश सोडला!

Sheikh Hasina

पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला ; हिंसाचारात आतापर्यंत किमान 300 लोकांचा मृत्यू


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बांगलादेशात आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. रविवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून येथे कर्फ्यू लागू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हिंसाचारात आतापर्यंत किमान 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, यासंदर्भात कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. बिघडलेली परिस्थिती पाहून पंतप्रधान शेख हसीना (  Sheikh Hasina )यांनी देश सोडला आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, त्या हेलिकॉप्टरने भारताकडे रवाना झाल्या आहेत. तसेच प्राप्त माहितीनुसार, पंतप्रधान हसिना यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.



ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, शेख हसीना आपल्या बहिणीसोबत भारताकडे रवाना झाल्या आहेत. पण इतर काही रिपोर्ट्सनुसार त्या लंडनलाही जाऊ शकतात असेही बोलले जात आहे. तत्पूर्वी, रॉयटर्सने एका स्त्रोताचा हवाला देत म्हटले होते की पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीला अधिकृत निवासस्थानापासून दूर सुरक्षित आश्रयस्थानात नेण्यात आले आहे. त्यानंतर काही वेळातच पंतप्रधान हसिना भारताकडे रवाना झाल्याचं आणखी एका वृत्तात म्हटलं आहे.

बांगलादेशातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानात आंदोलक घुसले आहेत. त्याचवेळी देशाचे लष्करप्रमुख वकार-उझ-जमान यांनी देशाला संबोधित केले. ते म्हणाले की, शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. अंतरिम सरकार स्थापन करणार. देशात लवकरच सर्व काही ठीक होईल.

Bangladesh Sheikh Hasina

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात