वृत्तसंस्था
संगारेड्डी : आपण “बंगारू तेलंगणा”चे अर्थात “स्वर्णिम तेलंगणा”चे स्वप्न साकार केले. आता आपले पुढचे लक्ष्य “बंगारू भारत देशम” अर्थात “स्वर्णिम भारत देश” असे असले पाहिजे, अशा शब्दांमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांनी आपली राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाकांक्षा आज जाहीर केली. bangaroo telangana bharat desham
संगारेड्डी जिल्ह्यात एका जाहीर सभेत त्यांनी राष्ट्रीय राजकारणावर मोठे भाष्य केले. आपण बंगारू तेलंगणाचे स्वप्न साकार केले आहे. तेलंगणाचा ज्या पद्धतीने सर्वांगीण विकास केला सर्व समाजाला बरोबर घेऊन विकासाचे लाभ दिले त्याच पद्धतीने भारताला देखील आपण “बंगारू भारत” अर्थात “स्वर्णिम भारत” करायचा निश्चय केला आहे. तेलंगणाला राष्ट्रीय राजकारणामध्ये यापुढे फार मोठी भूमिका बजावायची आहे, असे चंद्रशेखर राव म्हणाले.
भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांच्या ऐक्याचा आज दुसरा अंक : उद्धव ठाकरे – केसीआर चंद्रशेखर रावांची मुंबईत डिनर डिप्लोमसी!!
भारताला अमेरिकेपेक्षा विकसित देश करण्याचे आपले स्वप्न आहे. अनेक युवक अमेरिकेला आपल्या करिअरचे डेस्टिनेशन मानतात. यापुढच्या काळात भारत हे युवकांच्या करिअरचे डेस्टिनेशन असले पाहिजे, अशी ही महत्त्वाकांक्षा चंद्रशेखर राव यांनी बोलून दाखवली. भारतामध्ये उत्तम मनुष्यबळ आणि संपत्ती दोन्हीचा मिलाफ आहे. त्याचा वापर योग्य पद्धतीने करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
चंद्रशेखर राव यांच्या आजच्या वक्तव्याने ते तेलंगणाचा मॉडेलचा भारतभर प्रसार करू इच्छितात हे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर जाहीर सभेत त्यांनी प्रथमच आपल्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचा उच्चार केला आहे. आपल्या मुक्त नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय पातळीवर सर्वांनी एकत्र येण्याचा मनसुबा बोलून दाखवला होता. आज तो त्यांनी जाहीररित्या सांगितला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App