वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात घातपाती कारवाया करण्यासाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पण फक्त पीएफआय संघटनेवर बंदी घातली नसून तिच्या उपसंस्थांवर देखील बंदी घातली आहे. Ban not only on PFI but also on its 9 ancillary units
बंदी घातलेल्या उपसंस्थांमध्ये रिहैब इंडिया फाउंडेशन, कँपस फ्रंट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम काउंसिल, नॅशनल विमेन फ्रंट, नॅशनल कन्फेडरेशन ऑफ ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन, जूनियर फ्रंट, एंपावर फाउंडेशन, रिहैब फेडरेशन यांचा समावेश आहे.
पीएफआयची मायावी रूपे
वर उल्लेख केलेली सर्व संस्था – उपसंस्थांची नावे लक्षात घेता पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय सारख्या मूळ संघटनेचे मायावी रूप समोर येते. यापैकी एकाही संघटना, संस्था अथवा उपसंस्थेच्या नावात इस्लामी असा शब्दही नाही. त्याचबरोबर इस्लामी कट्टरता वादाशी त्यांचा संबंध आहे याचा मागमूसही नावांमधून लागत नाही.
उलट दुर्बल घटकांचे पुनर्वसन करणारी संस्था, महिलांचे सक्षमीकरण करणारी संस्था, मानवी हक्क जपणारी संस्था आदी मानवतावादी सेवाभावी नावे यामध्ये दिसतात. पण प्रत्यक्षात पीएफआय सारख्या संघटनांची घातपाती कृत्ये करणारी हिंसक रूपे बाहेर आल्यानंतर त्या मागचे खरे इंगित बाहेर आले आहे आणि ते समाजात वेगवेगळ्या मानवतावादी नावाखाली इस्लामी कट्टरतावादी विष पसरवण्याचेच दिसले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App