विशेष प्रतिनिधी
लखनऊ : बहुजन समाज पक्षाने विधानसभेची उमेदवारी विकण्याची परंपरा कायम ठेवली आहे. मात्र, यावेळी एका उमेदवाराकडून पैसे घेऊनही त्याला तिकिट दिले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या या उमेदवाराने बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.Bahujan Samaj Party did not give tickets even after taking Rs 67 lakh, angry candidate warns of self-immolation in front of Mayawati’s house
मुजफ्फरनगर येथील चरथावल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी अशरद राणा यांच्याकडून ६७ लाख रुपये घेण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात उमेदवारी दुसºयालाच देण्याचे चालले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या राणा यांनी म्हटले आहे की, बहुजन समाज पार्टीचे पश्चिम प्रभारी शमसुद्दीन राइन यांनी माझ्याकडून ६७ लाख रुपये घेतले.
तरीही उमेदवारी दिली नाही. त्यांनी माझे पैसे परत दिले नाहीत तर दोन दिवसांनी ाी बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांच्या घरासमोर आत्मदहन करणार आहे. माझ्या उमेदवारीची घोषणा शमसुद्दीन राय यांनी १८ डिसेंबर २०१८ रोजी केली होती. त्यावेळी चरथावल येथील बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते.
तेव्हापासून मी या विधानसभा मतदारसंघात रात्रंदिवस मेहनत करत आहे. माझे सगळे सहकारीही जाणतात की मी कष्ट करण्यास कोणतीही कसर ठेवेली नाही. मात्र, आता निवडणुका तोंडावर आल्या असताना या लोकांनी माझ्याकडे दूर्लक्ष करायला सुरूवात केली. आपण या संदर्भात जिल्हाध्यक्षांपासून सगळ्यांकडे दाद मागितली.
परंतु, कोणीही लक्ष दिले नाही. उलट माझ्याकडून आणखी पैसे मागितले जात आहेत. आत्ता २५ लाख आणि उमेदवारीची घोषणा झाल्यावर २५ लाख रुपये मागत आहेत. वास्तविक ६७ लाख रुपये मी अगोदरच दिले आहे. आता माझ्यावर दुसरा उमेदवार थोपला जात आहे. त्यामुळे माझे घेतलेले पैसे परत केले नाहीत तर मी मायावतींच्या घरासमोर आत्मदहन करणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App