विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय भारताची प्रतिमा मलिन करण्याचे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही सर्व जण याचे साक्षीदार आहात. हे निव्वळ राजकारण आहे. आपण यापासून दूर जाऊ शकत नाही. जगाला भारताची खरी ओळख करून देणे हे आपले कर्तव्य आहे, असे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.Attempts to tarnish India’s image internationally through politics, Prime Minister Narendra Modi alleges
माउंट अबू येथील बह्मकुमारीज संस्थानतर्फे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी व्हर्च्युअल पद्धतीने सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी सांगितले, की भारताची प्रतिमा मलिन करण्याचे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. हे राजकारण नसून आपल्या देशाचा प्रश्न आहे. ब्रह्मकुमारीज संस्थानसारख्या अशा संस्था ज्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्तित्व आहे,
त्यांनी जगासमोर भारताची खरी प्रतिमा पोहोचवायला हवी. भारताबद्दल ज्या अफवा पसरविण्यात येत आहेत, त्यांचे सत्य जगासमोर आणून आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताबाबत जागरूक करावे, हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
मोदी म्हणाले, आपण नवीन भाारताची निर्मिती करीत आहोत. त्यात भेदभावाला कुठलीही जागा राहणार नाही. समानता व सामाजिक न्यायाच्या भक्कम पायावर उभा असलेला समाज आपण बनवीत आहोत. या भारताचा विचार आणि दृष्टिकोन पूर्णपणे नवा आहे. राष्ट्राच्या प्रगतीमध्येच आपली प्रगती आहे. राष्ट्रासोबतच आपलेही अस्तित्व आहे.
ही जाणीव या नव्या भारताच्या निर्मणामध्ये आपली सर्वांत मोठी शक्ती आहे. राणी चेन्नम्मा, मातंगिनी हाजरा, राणी लक्ष्मीबाई, कित्तूरच्या वीरांगना झलकारीबाईपासून ते अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्षेत्रात भारताची अस्मिता जपली. जेव्हा जग गडद अंधारात होते,
स्त्रियांबद्दल जुन्या विचारसरणीत अडकले होते, तेव्हा भारत माता शक्तीची देवीच्या रूपात पूजा करत असे. आमच्याकडे गार्गी, मैत्रेयी, अनुसूया, अरुंधती आणि मदालसा यासारख्या विद्वान स्त्रियांनी समाजाला ज्ञान दिले, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी महिलांचा गौरव केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App