विशेष प्रतिनिधी
मुंबई : नुकताच सारा अली खान, अक्षय कुमार आणि धनुष यांची प्रमुख भूमिका असणारा अतरंगी रे हा चित्रपट हॉट स्टारवर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळत आहे. हॉट स्टारवर ओपनिंग डे दिवशी सर्वात जास्त पाहिलेला हा चित्रपट ठरला आहे.
Atarangi Re: Cinema in trouble, demand to ban movie on charges of promoting love jihad
या चित्रपटात साराची आई आणि अक्षय कुमार यांची लव्ह स्टोरी दाखवण्यात आलेली आहे. साराची आई हिंदू आहे आणि तिचा लव्हर अक्षय कुमार याला मुस्लीम दाखवण्यात आले आहे. तर आता बऱ्याच प्रेक्षकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यांच्या मते या चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादला चालना दिली जात आहे. त्यामुळे हा चित्रपट बॅन करण्याची मागणी देखील ट्विटरवर सध्या जोर धरत आहे.
See clear evidence of promoting #Love_Jihad in @akshaykumarFlim, So another task he has given to us to #Boycott_Atrangi_Re pic.twitter.com/9R11W3xdGs — Dr Bharati Anil Hedau (@DrHedau) December 29, 2021
See clear evidence of promoting #Love_Jihad in @akshaykumarFlim, So another task he has given to us to #Boycott_Atrangi_Re pic.twitter.com/9R11W3xdGs
— Dr Bharati Anil Hedau (@DrHedau) December 29, 2021
अतरंगी रे मुव्ही रिव्ह्यू : ना अक्षय कुमार ना सारा अली खान, अतरंगी रे मध्ये धनुष चकाचक झळकतोय
मागे अभिनेत्री करीना कपूरला देखील तिच्या वैयक्तिक आयुष्यावरून ट्रोल करण्यात आले होते. करीना कपूर हिंदू आहे तर तिचा नवरा सैफ अली खान हा मुस्लीम आहे. त्यामुळे करिना कपूरच्या सिनेमांना देखील बॅन करण्याबाबत ट्विटरवर मोहीम राबवण्यात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App