वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या भवानीपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होताच पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे वळल्या आहेत.पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक दुर्गापूजा मांडवाला राज्य सरकार तर्फे 50 हजार रुपये देण्याची घोषणा तर त्यांनी केलीच आहे,As soon as by-elections came, Mamata turned to Hindutva; Demand for declaration of Durga Puja as a World Heritage Site
पण त्याचबरोबर ममतांनी आणखी एक मागणी केली आहे ती केंद्रातल्या मोदी सरकारकडे नसून थेट युनेस्कोकडे केली आहे. युनेस्कोने बंगालमधील दुर्गा पूजेला जागतिक वारसा कार्यक्रम म्हणून घोषित करावे अशी ही मागणी आहे.
युनेस्को जगभरातील विविध स्थळांना जागतिक वारसा पर्यटन स्थळे जाहीर करत असते. तशा स्वरूपाची वैशिष्ट्ये दूर्गापूजेमध्ये आहेत. कोट्यावधी जनतेची आस्था दुर्गा पूजेशी जोडली गेली आहे. म्हणून युनेस्कोने दुर्गा पूजेला जागतिक वारसा कार्यक्रम घोषित करावे, असे पत्र ममतांनी युनेस्कोला पाठविले आहे.
ममतांची पोटनिवडणूक 30 सप्टेंबर रोजी होत आहे. याच काळात बंगालमध्ये दुर्गापूजेला जोर असेल. अशा वेळी आपण हिंदुत्व विरोधी भूमिका घेऊन चालणार नाही हे ममता बॅनर्जी यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच त्यांनी दुर्गा पूजेला जागतिक वारसा कार्यक्रम जाहीर करण्याच्या मागणीचा नेमक्या वेळी पुनरुच्चार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App