
वृत्तसंस्था
बंगळुरू : बंगळुरूमधील 48 खासगी शाळांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. शुक्रवार 1 डिसेंबर रोजी ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली. सर्व शाळांना एकाच वेळी एक ई-मेल प्राप्त झाला, ज्यामध्ये शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. As many as 48 schools in Bangalore threatened with bombs
शाळा प्रशासनाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शाळांमधून विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं आणि शोधमोहीम सुरू केली. बॉम्बशोधक पथक, श्वान पथक आणि तोडफोड विरोधी पथकही घटनास्थळी पोहोचले.
बॉम्बची माहिती मिळताच पालक मुलांना घेण्यासाठी आले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. मात्र, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी या ई-मेलला अफवा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले- घाबरण्याची गरज नाही. 24 तासांत आरोपींना पकडू.
शोधमोहीम जवळपास संपल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत एकाही शाळेत संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री म्हणाले- 24 तासांत आरोपी पकडले जातील
घटनेची माहिती मिळताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी शाळेत पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री म्हणाले- टीव्हीवर शाळेत बॉम्बची बातमी पाहून घाबरलो. धमक्या आलेल्या काही शाळा माझ्या घराजवळ आहेत.
पोलिसांनी मला ई-मेल दाखवला आहे. हे बनावट दिसते. काही भंपक घटकांनी हे कृत्य केले असावे. आम्ही त्यांना 24 तासांत पकडू. सायबर क्राइम पोलिस सक्रिय आहेत, ते त्यांचे काम करत आहेत. मी पोलिसांशी बोललो, पण आपण सावध राहिले पाहिजे.
आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही
बंगळुरू पोलिसांनी सांगितले की, सर्व शाळा शहराच्या वेगवेगळ्या भागात आहेत. अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही. बॉम्बची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक मुलांना घेण्यासाठी आले होते. त्यामुळे अराजकता निर्माण झाली.
सर्व विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे. यात घाबरण्यासारखे काही नाही. पोलिसांनी सांगितले की, गेल्या वर्षी बंगळुरूमधील सात शाळांना अशाच प्रकारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या, परंतु त्या केवळ अफवा ठरल्या.
As many as 48 schools in Bangalore threatened with bombs
महत्वाच्या बातम्या
- Madhya Pradesh Exit Poll : मध्य प्रदेशात कोणाचे सरकार? भाजपची कायम राहणार सत्ता! पाहा महानिकालाचा अंदाज
- Rajasthan Exit Poll : राजस्थानात भाजपची सत्ता, जवळपास सर्वच पोलमध्ये काँग्रेसची निराशा
- आता ‘या’ राज्यात पेपरफुटीप्रकरणी जन्मठेप आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंड!
- म्यानमारमधून मिझोराममध्ये पळून आलेल्या आणखी 30 सैनिकांना मायदेशी परत पाठवले