जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर मधले आर्य समाज स्कूल तब्बल 33 वर्षांनंतर पुन्हा सुरू; विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण!!

वृत्तसंस्था

श्रीनगर  :जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर तेथे गुंतवणुकीपासून ते सामाजिक बदलांपर्यंत अनेक महत्त्वाचे सुधारणा होत आहेत यापैकीच एक महत्त्वाचे सुधारणा म्हणजे श्रीनगर मध्ये 1990 च्या दशकातील दहशतवादाच्या काळात बंद पडलेले आर्य समाज स्कूल तब्बल 33 वर्षानंतर पुन्हा सुरू झाले आहे. या शाळेत सुमारे 50 विद्यार्थ्यांना आर्य समाज संस्था जम्मू कश्मीर केंद्रशासित प्रशासनाच्या प्रोत्साहनाने मोफत शिक्षण देत आहे. Arya Samaj school reopens after 33 years in Jammu & Kashmir

1990 च्या दशकात काश्मीरमध्ये दहशतवाद शिगेला पोहोचला असताना आर्य समाज स्कूल बंद करावे लागले होते. तेथे एका दहशतवादी संघटनेच्या समर्थकाने ते स्कूल ताब्यात घेऊन तिथे स्वतःचे प्रशिक्षण वर्ग चालविले होते. पण आर्य समाज संस्थेने मोठी न्यायालयीन लढाई लढत या शाळेचा ताबा पुन्हा मिळवला आणि काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर 2023 मध्ये ही शाळा पुन्हा सुरू करण्यात आली. सध्या सुमारे 50 विद्यार्थी तिथे मोफत शिक्षण घेत असून ते प्रामुख्याने ही शाळा असलेल्या सराफा कदल भागातलेच आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापिका मूळच्या लखनऊच्या असून आर्य समाज संस्थेचे प्रमुख अरुण चौधरी यांच्या पुढाकाराने आणि प्रोत्साहनाने त्या इथे काम करत आहेत. शाळेतील काही विद्यार्थ्यांचे पालक दरमहा 500 रुपयांची संस्थेला मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.


“आम्ही कधीही निवडणुका घेण्यास तयार आहोत…”: केंद्राने जम्मू-काश्मीरबाबत सर्वोच्च न्यायालयाला दिले उत्तर


तब्बल 33 वर्षानंतर आर्य समाज स्कूल पुन्हा सुरू करणे हे मोठे आव्हान होते. परंतु, स्थानिक पालकांची बोलल्यानंतर त्यांनी सहकार्याची तयारी दाखविली. सुरक्षिततेची हमी घेतली आणि त्यानंतर आपले पाल्य शाळेत पाठवायला ते तयार झाले. जम्मू काश्मीरमध्ये सध्या जे सकारात्मक बदल होत आहेत, त्यापैकी आर्य समाज स्कूल पुन्हा सुरू होणे हा फार महत्त्वाचा बदल घडलेला दिसतो आहे.

Arya Samaj school reopens after 33 years in Jammu & Kashmir

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात