Arvind kejriwal : लोकशाही व्हाया नोकरशाही, ते घराणेशाही; केजरीवालांच्या प्रवासाचे वर्तुळ पूर्ण व्हायच्या बेतात!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Arvind kejriwal लोकशाही व्हाया नोकरशाही, ते घराणेशाही असे अरविंद केजरीवालांच्या प्रवासाचे वर्तुळ पूर्ण व्हायच्या बेतात आले आहे. Arvind kejriwal turning to dynasty politics

सुप्रीम कोर्टाने सगळ्या राजकीय नाड्या पूर्ण आवळल्यानंतर अरविंद केजरीवालांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणे भाग पडले म्हणून त्यांनी तशी घोषणा केली. पण थेट राजीनामा दिला नाही. त्यासाठी दोन दिवसांचा अवधी कार्यकर्त्यांकडे मागून घेतला. दरम्यानच्या काळात आम आदमी पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांची एक समिती नेमून ती समिती मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेईल, असे केजरीवालांनी जाहीर केले त्या समितीत स्वतःच आहेत. शिवाय मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतले मनीष सिसोदिया यांचे नाव केजरीवालांनी चलाखपणे कापून टाकले. त्यामुळे उरलेल्या चार-पाच जणांमधून दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची निवड होणार असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. त्यामध्ये अतिशी मार्लेना, राखी बिर्ला, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज यांची नावे आघाडीवर असल्याचे बातम्यांमध्ये नमूद केले आहे. मात्र, आम आदमी पार्टीच्या कुठल्याही सूत्रांनी त्या बातमीला दुजोरा दिला नाही. विशेष म्हणजे माध्यमांच्या यादीमध्ये सुनीता केजरीवाल हे नाव सगळ्यात शेवटी नोंदविल्याचे दिसले आहे.  Arvind kejriwal


Dhangar : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


तसेही अरविंद केजरीवाल दारू घोटाळ्यात तुरुंगात गेल्यानंतर हळूहळू सुनीता केजरीवाल यांनी त्यांची जागा घ्यायला सुरुवात केलीच होती. दिल्ली, रांची, पाटणा मधल्या “इंडी” आघाडीच्या मोठमोठ्या रॅल्यांमध्ये सुनीता केजरीवालांनाच आम आदमी पार्टीच्या प्रतिनिधी म्हणून बड्या नेत्यांच्या रांगेत स्थान देण्यात आले होते. त्यातून दिल्लीत केजरीवाल लालू – राबडी फॉर्म्युला राबविणार हे उघड दिसत होते. आता उद्या त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कारण आम आदमी दिल्ली विधिमंडळ पार्टीची उद्या बैठक घेऊन तिच्यात मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. ते नाव सुनीता केजरीवाल असण्याची दाट शक्यता आहे. Arvind kejriwal

एका अर्थाने अरविंद केजरीवालांचा लोकशाही व्हाया नोकरशाही, ते घराणेशाही हा प्रवास उद्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण केजरीवालांनी आपल्या जीवनाच्या प्रवासाची सुरुवात महसूल सह आयुक्त म्हणून दिल्लीत केली होती. तिथून त्यांनी 2006 मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेऊन सामाजिक क्षेत्रात आणि नंतर राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. संपूर्ण समाज परिवर्तनाची आपल्याला आस आहे हे त्यांनी समाजमनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनाचा आधार घेऊन केजरीवाल राजकारणात प्रवेशले. तिथून थेट दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर बसले. आम आदमी पार्टीची रचना इतर सर्व राजकीय पक्षांच्या रचनांपेक्षा वेगळी असल्याचे सुरुवातीला त्यांनी भासविले. दिल्लीच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास देखील ठेवला. त्यानंतर पंजाबच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला. पंजाब मध्ये केजरीवालांनी आम आदमी पार्टीची सत्ता आणली.

पण दारू घोटाळ्यात तुरुंगात जावे लागल्यानंतर ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने राजकीय नाड्या पूर्ण आवळल्या, त्यावेळी त्यांना राजीनामा देणे भाग पडले, पण आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर नवे नाव नियुक्त करताना त्यामध्ये सुनीता केजरीवालांचे नाव राजकीय पटावरून कसे पुढे सरकेल, असे पाहिले जात आहे. यातूनच केजरीवालांचा लोकशाही व्हाया नोकरशाही, ते घराणेशाही हा प्रवास पूर्ण होण्याच्या बेतात आला आहे.

Arvind kejriwal turning to dynasty politics

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात