विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सामावून घ्या. त्यांच्याशी समन्वय राखा, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिले असले आणि भाजपच्या नेत्यांचे जरी तसे प्रामाणिक प्रयत्न असले, तरी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भूमिकेबद्दल महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात दाट संशयाचे मळभ आहे. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी तसे बोलून दाखवले आहे.
आगामी काळात अजित पवार यांचे अर्धाहून अधिक आमदार हे शरद पवार गटात जातील, असा दावा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.
बच्चू कड म्हणाले :
आगामी काळात अजित पवार यांचे अर्धाहून आधिक आमदार हे शरद पवार गटात जातील. काही दिवसांनी अजित पवारदेखील तिकडे दिसू शकतात. त्यांना कुणीही अडवलेलं नाही. शेवटी हे राजकारण आहे. कधी कुणाच्या पारड्यात जाऊन बसायचं किंवा कुणाबरोबर राहायचं, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे.
लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या श्रेयावादाच्या लढाईवरही भाष्य केलं. “राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे श्रेयवादाची लढाई होणारच आहे. ते संयुक्तीक आहे. भाजपा म्हणतंय की लाडकी बहीण योजना आम्ही आणली, शिंदे गट म्हणतंय आम्ही आणली आणि अजित पवार यांचा पक्षही म्हणतोय की ती योजना आम्ही आणली. पण ही लाडकी बहीण योजना कुणी आणली, हे त्यानांच ठरवायचं आहे.
Dhangar : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विरोधकांनी आपल्याला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, असं नितीन गडकरी म्हणाले होते. गडकरी यांच्या विधानाचा अर्थ काँग्रेसकडे पंतप्रधान पदासाठी माणसं नाही, असं होतो.
तिसरी आघाडी नक्कीच दिसेल
बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगरनंतर मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती, याबाबत विचारलं असता, तिसरी आघाडी म्हणून हा मोर्चा काढण्याचं आमचं ठरलं होतं. यासंदर्भात १९ तारखेला पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल. आगामी विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नक्कीच दिसेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more