विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rajesh tope मनोज जरांगे यांचे आंदोलन नेमके कोणी भडकविले?? याविषयी महाराष्ट्रात वाद प्रतिवाद सुरू असताना छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांना त्याबद्दल जबाबदार धरले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी नेहमीप्रमाणे छगन भुजबळ यांवर ते देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक असल्याच्या आरोपांच्या फैरी झाडल्या. रोहित पवारांनी देखील जरांगे यांची बाजू उचलून धरत छगन भुजबळांवर तोफा डागल्या. Rajesh tope
पण आता केवळ छगन भुजबळच नाही, तर मराठा आरक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी देखील मनोज जरांगे यांचे आंदोलन भडकविण्यात पवारांच्याच राष्ट्रवादीचा हात असल्याकडे बोट दाखविले. राजेश टोपे यांचे नाव घेऊन त्यांनी थेट तसा आरोप केला. Rajesh tope
नरेंद्र पाटलांनी सोलापूरच्या दौऱ्यावर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राजेश टोपे यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला. राजेश टोपे ज्यावेळी ठाकरे – पवारांच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय उचलून धरला नव्हता. त्यावेळी त्यांना केंद्र सरकारने दिलेले आर्थिक मागास आरक्षण मराठ्यांसाठी मान्य होते. परंतु, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महायुतीचे सरकार आले. महाविकास आघाडीला विरोधी पक्षात बसावे लागल्यानंतर राजेश टोपे यांची भूमिका बदलली. त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला भडका लावायचे काम केले, असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला. Rajesh tope
मनोज जरांगे यांचे आंदोलन चिघळण्याआधी राजेश टोपे सतत त्यांच्या शेजारी बसलेले पाहायला मिळाले, असे महत्त्वाचे निरीक्षण नरेंद्र पाटील यांनी नोंदविले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more